तसे, कुंडलीत अशुभ स्थितीत कोणत्याही ग्रहाची उपस्थिती जीवनात दुःख आणि संकटांना कारणीभूत ठरते. पण शनि आणि राहू-केतू अशुभ असणे जीवनातील संकटे अधिक तीव्र करतात. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहांच्या शांतीसाठीचे उपाय लवकरात लवकर करून घेण्याचा सल्ला दिला जातो. कुंडलीत राहु अशुभ असेल तर त्याची लक्षणे जीवनात स्पष्टपणे दिसू शकतात. अशुभ राहूची लक्षणे आणि त्यापासून सुटका करण्याचे उपाय जाणून घेऊया.

ही आहेत अशुभ राहूची लक्षणे :

  • राहु अशुभ असेल तर घराचा बाह्य भाग दडपतो किंवा खराब होतो. दुसरीकडे, घराच्या पायऱ्या चुकीच्या दिशेने बनवणे किंवा तोडणे यामुळे राहू दोष निर्माण होतो.
  • कुंडलीत राहु अशुभ असेल तर व्यक्ती नशेच्या आहारी जाते.

सोने-चांदीच्या दागिन्यांसोबत जोडलेल्या आहेत ‘या’ शुभ-अशुभ गोष्टी; हरवल्यास होऊ शकते मोठे नुकसान

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
  • अशा व्यक्तींची सतत चिडचिड होते. त्याच वेळी, असे लोक भविष्याबद्दल खूप उदासीन होतात.
  • घरातील बाथरुम-टॉयलेट सतत अस्वच्छ राहिल्यास किंवा तुटल्याने राहू खराब होतो. त्यामुळे या प्रकरणात सावधगिरी बाळगा.
  • जर एखादी व्यक्ती जादूटोण्याच्या प्रकरणात अडकली असेल तर ते राहूच्या अशुभतेमुळे देखील होते.
  • रात्री झोप न लागणे, भीतीदायक स्वप्ने पडणे, भीतीमध्ये राहणे, सतत अस्वस्थ राहणे, निर्णय घेता न येणे हे वाईट राहूचे लक्षण आहे.
  • पाणी, आग आणि उंचीची भीती, पुन्हा पुन्हा आजारी पडणे, संकटे आणि अपयश पदरी पडणे ही देखील वाईट राहूची लक्षणे आहेत.
  • घरातील दगड, काचा अचानक फुटल्याच्या घटना.
  • लोकांशी विनाकारण शत्रुत्व करणे, लोकांना फसवणे, त्यांच्या विरोधात कट रचण्याचा विचार करणे यामुळेही राहू खराब होतो.
  • नखे घाणेरडे ठेवणे, अस्वच्छ राहणे हे राहूच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे.
  • राहू अशुभ असल्यास मनुष्य अनेक महिलांशी संबंध ठेवतो. तसेच, पैशाचे नुकसान होते.
  • राहूच्या कमजोरीमुळे जीवनात अपघात होतात.

तुम्ही देखील बिछान्यावर बसून जेवण करता? वास्तूशीसंबंधित ‘या’ चुका ठरू शकतात गरिबीचे कारण

अशुभ राहू टाळण्याचे उपाय :

  • कुंडलीत राहु अशुभ असेल तर शनिवारीचे व्रत करावे. तुमच्या घरातील मंदिरात राहू यंत्राची स्थापना करा आणि नियमानुसार रोज त्याची पूजा करा. यामुळे मोठा फरक पडेल.
  • ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे दोन छोटे साप बनवून वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने राहू दोषापासून मुक्ती मिळते.
  • राहुच्या शांतीसाठी ‘ऊँ भ्रं भ्रं भ्राऊं सह राहवे नमः’ या बीज मंत्राचा १८ हजारवेळा जप करावा.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीच्या आधारावर आहे. वरील उपाय वापरण्याआधी तज्ञांकडून खात्री करून घ्यावी.)

Story img Loader