तसे, कुंडलीत अशुभ स्थितीत कोणत्याही ग्रहाची उपस्थिती जीवनात दुःख आणि संकटांना कारणीभूत ठरते. पण शनि आणि राहू-केतू अशुभ असणे जीवनातील संकटे अधिक तीव्र करतात. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहांच्या शांतीसाठीचे उपाय लवकरात लवकर करून घेण्याचा सल्ला दिला जातो. कुंडलीत राहु अशुभ असेल तर त्याची लक्षणे जीवनात स्पष्टपणे दिसू शकतात. अशुभ राहूची लक्षणे आणि त्यापासून सुटका करण्याचे उपाय जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
ही आहेत अशुभ राहूची लक्षणे :
- राहु अशुभ असेल तर घराचा बाह्य भाग दडपतो किंवा खराब होतो. दुसरीकडे, घराच्या पायऱ्या चुकीच्या दिशेने बनवणे किंवा तोडणे यामुळे राहू दोष निर्माण होतो.
- कुंडलीत राहु अशुभ असेल तर व्यक्ती नशेच्या आहारी जाते.
सोने-चांदीच्या दागिन्यांसोबत जोडलेल्या आहेत ‘या’ शुभ-अशुभ गोष्टी; हरवल्यास होऊ शकते मोठे नुकसान
- अशा व्यक्तींची सतत चिडचिड होते. त्याच वेळी, असे लोक भविष्याबद्दल खूप उदासीन होतात.
- घरातील बाथरुम-टॉयलेट सतत अस्वच्छ राहिल्यास किंवा तुटल्याने राहू खराब होतो. त्यामुळे या प्रकरणात सावधगिरी बाळगा.
- जर एखादी व्यक्ती जादूटोण्याच्या प्रकरणात अडकली असेल तर ते राहूच्या अशुभतेमुळे देखील होते.
- रात्री झोप न लागणे, भीतीदायक स्वप्ने पडणे, भीतीमध्ये राहणे, सतत अस्वस्थ राहणे, निर्णय घेता न येणे हे वाईट राहूचे लक्षण आहे.
- पाणी, आग आणि उंचीची भीती, पुन्हा पुन्हा आजारी पडणे, संकटे आणि अपयश पदरी पडणे ही देखील वाईट राहूची लक्षणे आहेत.
- घरातील दगड, काचा अचानक फुटल्याच्या घटना.
- लोकांशी विनाकारण शत्रुत्व करणे, लोकांना फसवणे, त्यांच्या विरोधात कट रचण्याचा विचार करणे यामुळेही राहू खराब होतो.
- नखे घाणेरडे ठेवणे, अस्वच्छ राहणे हे राहूच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे.
- राहू अशुभ असल्यास मनुष्य अनेक महिलांशी संबंध ठेवतो. तसेच, पैशाचे नुकसान होते.
- राहूच्या कमजोरीमुळे जीवनात अपघात होतात.
तुम्ही देखील बिछान्यावर बसून जेवण करता? वास्तूशीसंबंधित ‘या’ चुका ठरू शकतात गरिबीचे कारण
अशुभ राहू टाळण्याचे उपाय :
- कुंडलीत राहु अशुभ असेल तर शनिवारीचे व्रत करावे. तुमच्या घरातील मंदिरात राहू यंत्राची स्थापना करा आणि नियमानुसार रोज त्याची पूजा करा. यामुळे मोठा फरक पडेल.
- ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे दोन छोटे साप बनवून वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने राहू दोषापासून मुक्ती मिळते.
- राहुच्या शांतीसाठी ‘ऊँ भ्रं भ्रं भ्राऊं सह राहवे नमः’ या बीज मंत्राचा १८ हजारवेळा जप करावा.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीच्या आधारावर आहे. वरील उपाय वापरण्याआधी तज्ञांकडून खात्री करून घ्यावी.)
First published on: 25-03-2022 at 17:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu dosh is the sign of this sorrow in life the appearance of these symptoms may be a cause for concern pvp