ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशी बदलत असतो. भ्रमण कालावधी प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा असल्याने अनेकदा ग्रह एका राशीत एकत्र येतात. शनी ग्रह अडीच वर्षांनी, राहु १८ महिन्यांनी तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात राहुला पापी ग्रह मानले जाते. राहु उलट्या दिशेन भ्रमण करतो. इतर ग्रहांचं भ्रमण मेष ते मीन असं असतं, तर राहु आणि केतूचं भ्रमण मीन ते मेष असं असतं. ग्रहाच्या बदलामुळे परिणाम होत असतात. १७ मार्च २०२२ रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार आहे. १८ महिन्यांनंतर राहूचे राशी बदल संपूर्ण जगासाठी मोठे बदल घडवून आणतील. साहजिकच भारत यापासून अलिप्त राहणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार मार्च २०२२ मध्ये होणार्या या राहू संक्रमणाचा देशाच्या राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावरही परिणाम होणार आहे.
१७ मार्चला राहु वृषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत दीड वर्षे ठाण मांडून बसणार आहे. राहूच्या मेष राशीत प्रवेशाच्या वेळी कुंडलीचे विश्लेषण केले तर शनि, मंगळ आणि शुक्र हे तीन ग्रह मकर राशीत एकत्र येत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम भारतावरही होईल.
Sun Transit 2022: ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत करणार प्रवेश, ‘या’ चार राशींचं भाग्य उजळणार
सध्या सुरू असलेल्या रुसो-युक्रेन युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. युक्रेन आणि रशिया हे जगातील सर्वाधिक गहू उत्पादक देश आहेत आणि हे दोन्ही देश रणांगणात आहेत. या परिस्थितीमुळे धान्याच्या किमती वाढतील, ज्यामुळे अनेक देशांमध्ये अन्न संकट निर्माण होऊ शकते. तसेच राहूच्या संक्रमणामुळे भारतात अवकाळी पाऊस पडेल, ज्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. राहूचे संक्रमण भारताच्या राजकारणातही गोंधळ निर्माण करू शकते. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मोठे नेते आणि अधिकाऱ्यांशी संबंधित अप्रिय घटना घडू शकतात. याशिवाय पूर आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींचीही शक्यता आहे.