ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशी बदलत असतो. भ्रमण कालावधी प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा असल्याने अनेकदा ग्रह एका राशीत एकत्र येतात. शनी ग्रह अडीच वर्षांनी, राहु १८ महिन्यांनी तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात राहुला पापी ग्रह मानले जाते. राहु उलट्या दिशेन भ्रमण करतो. इतर ग्रहांचं भ्रमण मेष ते मीन असं असतं, तर राहु आणि केतूचं भ्रमण मीन ते मेष असं असतं. ग्रहाच्या बदलामुळे परिणाम होत असतात. १७ मार्च २०२२ रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार आहे. १८ महिन्यांनंतर राहूचे राशी बदल संपूर्ण जगासाठी मोठे बदल घडवून आणतील. साहजिकच भारत यापासून अलिप्त राहणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार मार्च २०२२ मध्ये होणार्या या राहू संक्रमणाचा देशाच्या राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावरही परिणाम होणार आहे.
रशिया युक्रेन युद्धाचा भारतावर ‘या’ तारखेपासून होणार परिणाम! कसं असेल ग्रहमान जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशी बदलत असतो.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-03-2022 at 16:35 IST
TOPICSज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeयुक्रेन संघर्षUkraine CrisisरशियाRussia
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu gochar 2022 in mesh rashi impact on world rmt