वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. ३० ऑक्टोबरला राहूने राशी परिवर्तन केलं आहे. राहूनं मेष राशीतून मीन राशीत प्रवेश केलायं. याच दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबरलाच ८ महिन्यानंतर रेवती नक्षत्रात प्रवेश केलायं. रेवती नक्षत्राची राशी मीन आहे. त्यामुळे आता रेवती नक्षत्रात राहूने प्रवेश केल्याने काही राशींचे नवीन वर्षात नशीब पालटू शकतात, असे वृत्त जनसत्ताने दिले आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
नवीन वर्षात ‘या’ राशींचे नशीब चमकणार?
मिथुन राशी
राहूने रेवती नक्षत्रात प्रवेश करुन या राशीत दहाव्या भावात प्रवेश केलाय. त्यामुळे या राशींच्या लोकांना नवीन वर्षात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांना भरघोस नफा मिळून गुंतवणुकीतून फायदा होण्याचीही शक्यता आहे. नवीन वर्षात पगारात मोठी वाढ होऊ शकते. विकासाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात.
(हे ही वाचा : वर्षाच्या अखेरिस ३ दुर्लभ योग घडल्याने ‘या’ राशींना नोकरीसह मिळणार प्रचंड पैसा? शनि-बुध कृपेने होऊ शकते धनवृष्टी)
कर्क राशी
राहू रेवती नक्षत्रात प्रवेश करुन या राशीच्या नवव्या भावात आहेत. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. यासोबतच तुमच्या रखडलेल्या योजनांना पुन्हा गती मिळू शकते. परदेशात जाण्याचे मार्ग तयार होऊ शकतात. अविवाहितांना आवडीचा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
राहू या राशीत सातव्या भावात आहेत. रेवती नक्षत्र आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे राहूने रेवती नक्षत्रात प्रवेश केल्याने या राशींच्या लोकांना जोरदार लाभ मिळू शकतो. नवीन वर्षात आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)