Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. ग्रहांच्या राशी बदलाचा शुभ अशुभ परिणाम मानवी जीवनावर होत असतो. यात मायावी ग्रह राहू सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे, राहू वेळोवेळी आपली चाल बदलत राहतो. राहूच्या नक्षत्रातील बदलाचा परिणाम हा सर्व १२ राशींवर होत असतो. ८ जुलै रोजी राहूने नक्षत्र बदल केला आहे. राहूने उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे, ज्याचा स्वामी शनि आहे. पुढील सहा महिने म्हणजे मार्च २०२५ पर्यंत राहू या नक्षत्रात राहणार आहे. शनिच्या नक्षत्रात राहूच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीचे लोक धनवान होतील, कोणाच्या वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होईल, जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनिच्या नक्षत्रात राहूचे संक्रमण, ‘या’ राशी होणार मालामाल ( Rahu Nakshatra Gochar 2024)

तूळ

राहूच्या नक्षत्राचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांना लाभदायी ठरू शकते. तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून अनेक महत्त्वाची कामे मिळू शकतात, जी तुम्हाला योग्यरित्या पार पाडावी लागतील. जीवनात सुख-समृद्धी नांदेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते, कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहू शकते.

कुंभ

कुंभ राशीतील राहूचे संक्रमण तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते असे मानले जाते. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुधारू शकते, खर्चही वाढू शकतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटकडे लक्ष ठेवा. या काळात नवीन सुरुवात शुभ राहील, म्हणजे एखादा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा शुभ काळ असेल. तुमच्या वैवाहिक जीवनातही गोडी निर्माण होईल, कुटुंबासह तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी राहू संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात तुम्हाला काही परदेशी करार मिळू शकतात, त्यामुळे व्यवसायात एक नवी आणि चांगली सुरुवात होऊ शकते, तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होईल. तुमचे तुमच्या जीवनसाथीबरोबर सुरू असलेले मतभेद, वादविवाद संपून नव्याने आयुष्याला सुरुवात कराल, दोघांच्या आयुष्यातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. राहूच्या शुभ प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.