Rahu Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू ग्रहाला सर्वात कठोर ग्रह म्हणून ओळखले जाते. राहूच्या प्रभावामुळे व्यक्ती सतत मागे पडतो. राहू दर दीड वर्षांनी आपली राशी बदलतो, तो शनीच्या प्रभावासारखाच मानला जातो. राहूने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मेष राशीतून मीन राशीत प्रवेश केला. पण, आता राहू मीन राशीतच राहील आणि कोणताही राशी बदल करणार नाही. राहूचे पुढील संक्रमण २०२५ मध्ये होईल. राहूचे हे संक्रमण काही राशींसाठी अशुभ आणि नकारात्मक प्रभाव टाकणारे असणार आहे. त्यामुळे राहूच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांचा त्रास वाढू शकतो हे जाणून घेऊ…
सिंह
राहूचे मीन राशीतील संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जात नाही. यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराबरोबर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावेळी गुंतवणूक करणे टाळा.
बुधाचं नक्षत्र गोचर ‘या’ राशींना करणार मालामाल? प्रत्येक कामात मिळू शकेल यश
कन्या
राहूचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकते. वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक भागीदारीवर परिणाम होऊ शकतो. यावेळी तुम्ही प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे टाळा. घरातही वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत राहूचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात नाही. त्याचवेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मीन
राहूचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम घेऊन आले आहे. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्याचबरोर कुटुंबाशी संबंधित तुमचा खर्चही वाढू शकतो. व्यावसायिक क्षेत्रात बॉसशी मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, सावध राहा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)