Rahu Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहूला एक रहस्यमय ग्रह मानले जाते. हा ग्रह नेहमी उलट दिशेने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. राहू एका राशीत सुमारे १८ महिने भ्रमण करतो अशा परिस्थितीत, त्याच्या राशिबदलाचा प्रभाव बराच काळ टिकतो. राहू ग्रह सध्या गुरूच्या मीन राशीत विराजमान आहे. हा ग्रह १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजून ०८ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. राहूच्या कुंभ राशीतील प्रवेशाने काही राशींच्या लोकांना फायदा होईल; तर काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. राहूच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे कोणत्या राशींना भरपूर फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊ…

राहू आणि केतू हे असे ग्रह आहेत की, जे नेहमी उलट्या दिशेने चाल करतात. त्यामुळे जेव्हा ते राशिबदल करतात तेव्हा ते पुढे नाही, तर एका राशीने मागे जातात. यावेळी राहू मीन राशीत स्थित आहे; पण तो वक्री झाल्यानंतर मेष राशीतून कुंभ राशीत प्रवेश करील. तो कुंभ राशीत ५ डिसेंबर २०२६ पर्यंत राशीत राहील.

राहूच्या कुंभ राशीतील प्रवेशाने ‘या’ राशी होतील मालामाल ( Rahu Gochar 2025 In Kumbha)

मेष

राहूचा कुंभ राशीतील प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमचे आयुष्य पुन्हा रुळांवर येऊ शकते. करिअरच्या क्षेत्रातही खूप फायदे होणार आहेत. पदोन्नतीसह पगारातही वाढ होऊ शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. समाजात आदर वाढू शकतो. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल.

कन्या

राहूचा कुंभ राशीतील प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात तुमच्या जीवनातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. त्यासह तुमच्या दीर्घकालीन समस्या कमी होऊ शकतात आणि आरोग्यही चांगले राहणार आहे. तसेच, नोकरी करणाऱ्यांनाही लाभ मिळू शकतो; पण थोडे सावध राहण्याची गरज आहे. कारण- तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणी घेऊ शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. त्यासह आता तुम्हाला पूर्वी केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात.

धनू

राहूच्या कुंभ राशीतील प्रवेशाने धनू राशीच्या लोकांसाठी ‘अच्छे दिन’ सुरू होऊ शकतात. या काळात धनू राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. त्यासह तुम्ही विविध ठिकाणी प्रवास करू शकता. यातून तुम्हाला खूप फायदाही होऊ शकतो. तुम्हाला अनेक कामांत तुमचे मित्र आणि कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद संपुष्टात येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा वेळ चांगला जाणार आहे. तसेच तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते; पण थोडी सावधगिरी बाळगा. कारण- काही सहकारी गैरसमज निर्माण करू शकतात.