Rahu Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतुला छाया ग्रह मानले जाते. या ग्रहांच्या स्थितीतील बदलांमुळे प्रत्येक राशीच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नेहमी परिणाम पडतो. राहु हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे. कारण या ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या लोकांवर दुष्परिणाम दिसून येतो.
राहु एका राशीमध्ये १८ महिन्यापर्यंत राहतो. त्यामुळे एक राशिचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला जवळपास १८ वर्षांचा वेळ लागतो. या वेळी राहु गुरूची राशी मीन राशीमध्ये विराजमान आहे आणि २०२५ मध्ये या राशीमधून बाहेर पडून शनिच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. राहुच्या या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर दिसून येईल. जाणून घेऊ या, राहु कुंभ राशीमध्ये प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा दिसून येईल.

पंचागनुसार, छाया ग्रह राहु १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ०८ मिनिटांनी शनिच्या राशीमध्ये म्हणजेच कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहे. सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी राहु कुंभ राशि मध्ये प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये पुढील १८ महिन्यापर्यंत राहून ५ डिसेंबर २०२६ मध्ये राशी परिवर्तन करणार आहे. राहु नेहमी वक्री अवस्थेत राशी परिवर्तन करतो.

मेष राशि (Mesh Zodiac)

मेष राशीमध्ये राहु एकादश स्थितीत राहणार आहे अशात या राशीच्या लोकांना राहुचे राशी परिवर्तन फायद्याचे ठरू शकते. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि धनलाभ मिळू शकतो. अडकलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. मान सन्मान वाढेल. पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील. मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होईल. करिअरसह व्यवसायात प्रगती दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. २०२५ मध्ये राहू या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो.

सिंह राशी (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी राहुचा कुंभ राशीमध्ये प्रवेश लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष सुखाचे असेल. करिअरमध्ये या लोकांना भरपूर यश, पदोन्नती आणि पगार मिळू शकतो. तसेच या लोकांना धनसंपत्ती प्राप्त होऊ शकते. कुटुंबाबरोबर हे लोक चांगला वेळ घालवतील. तसेच हे लोक जोडीदाराच्या सहकार्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. वैवाहिक जीवनात आनंद व शांती दिसून येईल.

धनु राशी (Dhanu Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी राहुचा कुंभ राशीमध्ये प्रवेश फायद्याचा ठरू शकतो. या राशीच्या तिसऱ्या स्थानावर राहु विराजमान राहणार. त्यामुळे यांना आयुष्यात भरपूर आनंद मिळू शकतो. घर कुटुंबातील समस्या दूर होतील. या लोकांचा धाडसीपणा वाढेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतात. हे लोक अध्यात्माकडे वळताना दिसू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)