Rahu Gochar Chandra Grahan Astrology: यंदाच्या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण हे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी लागणार आहे. दसऱ्याच्या पाच दिवसांनी म्हणजेच २८ ऑक्टोबरला चंद्र ग्रहण आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी चंद्र ग्रहणाचा कालावधी सुरु होणार आहे तर मध्यरात्री ३ वाजून ५६ मिनिटांनी चंद्र ग्रहण तिथी समाप्त होणार आहे. यंदाच्या वर्षातील हे पहिले व शेवटचे चंद्र ग्रहण असणार आहे जे भारतातून सुद्धा दिसणार आहे. चंद्रग्रहणासह याच कालावधीत राहू गोचर सुद्धा होणार आहे. राहूच्या प्रभावाने काही राशींना या कालावधीत लाभ होण्याची चिन्हे आहेत. तर चंद्र ग्रहणाने सुद्धा हा प्रभाव द्विगुणित होण्याचे संकेत आहेत. नेमक्या कोणत्या राशींवर फायदेशीर प्रभाव होणार हे पाहूया..
चंद्र ग्रहण व राहू प्रभाव, ‘या’ राशींचे आयुष्यात येणार श्रीमंती?
वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)
वृषभ ही शुक्राची राशी त्या राशीच्या लाभस्थानात राहूचे वास्तव्य खूपच शुभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात हा राहू यशदायक ठरेल. तर नवीन परिचय, नवीन ओळखीतून उद्योगधंद्यात नोकरीत नव्या योजना आखल्या जातील. एकूण नातेवाईक मित्रमंडळींचा सहवास आनंदी उत्साही ठरेल. शुक्राची ही रास नी अकराव्या स्थानातील मीनेचा राहू नेपच्यून अध्यात्मिक अभ्यासाला उत्तम ठरतो. त्यातून सुचणारे आचारविचार सामाजिक जगण्याला खूप मार्गदर्शक ठरतील. या राहू सहवासाच्या अठरा महिन्याच्या काळात मिळणारे आत्मिक समाधान पैशाहून खूप मोलाचे ठरेल. कुणावरही अतिविश्वास ठेवू नये.
मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)
मिथुन ही बुधाची स्वगृहीची रास १८ नोव्हेंबर २०२३ ला राहू मिथुन राशीच्या दशमात प्रवेश करणार आहे. सोबत नेपच्यून एकूण दशम स्थानातील या दोन ग्रहांच्या वास्तव्यामुळे या १८ महिन्याच्या काळात उद्योगधंद्यात नोकरीत कमालीचे उत्तम बदल दिसून येतील. विद्या, संगीतकला, लेखन, चित्रकला या विषयातील लोकांनाही उत्तम नावलौकीक प्राप्त होईल. घरात येणारे पैसे जे आजवर अडकून पडले असतील ते न मागता व अगदी सहजरित्या परत मिळू शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)
वृश्चिक राशीला पंचमात राहू जरी काळ कठीण असला तरी काही बंधने स्वत:वर घातली तर खूपशा त्रासापासून स्वत:ला दूर ठेवू शकाल. उद्योगधंद्यात नोकरीत मिळणारा पैसा जपून ठेवावा. उद्योगधंद्यात नोकरीत नवीन नवीन संधी प्राप्त होतील. राजकारण, सामाजिक कार्यात आपले वर्चस्व कायम राखू शकाल. दुरच्या प्रवासाचे योग घडून येतील. त्यातील ओळखी परिचयातून लाभ संभवतील. धनलाभामुळे कर्जमुक्त होण्याची संधी मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)