Rahu Gochar In Kumbh Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. त्यातील शनी आणि राहू-केतू यांचं नाव घेतलं तरी घाम फुटतो. शनी देव ही न्यायदेवता आहे; तर राहू आणि केतू यांना छाया ग्रह आणि मायावी, असं म्हटलं जातं. असं म्हटलं जाते की, राहू जेव्हा जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा तेव्हा त्याच्या प्रभावामुळे सर्व १२ राशी प्रभावित होतात. राहूच्या शुभ प्रभावामुळे अनेक वेळा व्यक्ती यशाच्या आणि नवीन संधींच्या मार्गावर असते. सध्या राहू मीन राशीत विराजमान आहे आणि मे २०२५ मध्ये राहू शनीच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. ज्योतिषांच्या मते, १८ मे २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता राहू मीन राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करतील. राहूच्या या संक्रमणामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पाहूयात भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींना मिळेल प्रचंड धनलाभाची संधी?

मेष

राहू गोचर स्थिती मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. तसेच, नोकरीत येणाऱ्या समस्या दूर होऊन, प्रत्येक क्षेत्रात तुमचा विकास होण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे, तर व्यापारी वर्गालादेखील याचा चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ

राहू‌ वृषभ राशीच्या लोकांसाठी  अनुकूल सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. जे लोक बेरोजगार आहेत किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला नवीन कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. तर, नोकरदार लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहेत.

मकर

राहूचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही खूप पूर्वी कोणाला पैसे दिले असतील किंवा तुमचे पैसे कुठे तरी अडकले असतील, तर ते या काळात परत मिळू शकतात. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

राहू गोचराने कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. या काळात तुम्हाला घर, वाहन किंवा जमिनीचे सुख मिळू शकते. या काळात भाग्य तुम्हाला साथ देऊ शकते. या काळात तुम्ही पैसे गुंतवा, जे तुम्हाला भविष्यात चांगला परतावा देऊ शकतात. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला ठरु शकतो. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

वृश्चिक

राहू गोचर स्थिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा वडिलांकडूनही आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. व्यावसायिक लोकांना नवीन सौदे मिळून, त्यांच्या कामाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नफा कमावण्यात यश मिळू शकते. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊन अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)