Rahu Gochar In Kumbh Rashi: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो. राहू केवळ दीड वर्षातून एकदा आपली चाल बदलतो. नवग्रहांत राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. राहू एका राशीत तब्बल १८ महिन्यांपर्यंत राहतो. त्यामुळे सध्या मीन राशीत असलेला राहू १८ मे रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक संकटं दूर होईन आर्थिक धनलाभ होतील.
राहूची ‘या’ तीन राशींवर विशेष कृपा
मेष (Aries)
राहूचा कुंभ राशीतील प्रवेश मेष व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीतच प्रवेश करणारा राहू कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी राहूचा कुंभ राशीतील प्रवेश शुभ फळ देणारा असेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)