ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष खूपच महत्त्वाचं आहे. कारण एप्रिल महिन्यात ग्रहांच्या बऱ्याच उलथापालथ होत आहेत. सर्व ग्रहांच्या राशी बदलाच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचं आहे. या वर्षात शनि, राहु, केतु हे तिन्ही ग्रह राशी बदल करत आहेत. शनि अडीच वर्षांनी आणि राहु-केतु दीड वर्षांनी राशी बदलतात. मात्र या वर्षात सर्वच ग्रहांच्या राशी बदलांची वेळ एकत्र आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उदय-अस्त होतो. तेव्हा त्याचा सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होतो. हा बदल काही व्यक्तींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असतो. १२ एप्रिल रोजी मायावी ग्रह राहू मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. अशुभ ग्रह राहूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे १८ महिने लागतात. इतर ग्रहांप्रमाणे राहु ग्रहाचा गोचर सरळ नसून उलट आहे. म्हणजेच हा ग्रह नेहमी मागे फिरतो. यामुळे ग्रह नेहमी राशीच्या मागील राशीत प्रवेश करतो. राहूचे संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहे. कारण राहु राजकारण, परदेश प्रवास, शेअर बाजार आणि महामारी यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या संक्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु तीन राशी शेअर व्यवसायात चांगला नफा मिळवू शकतात. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
मिथुन: राहू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ चांगले राहील. कारण राहु ग्रह तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करेल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हटलं जातं. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. राजकारणात प्रयत्न करणाऱ्यांनाही यावेळी यश मिळू शकते. मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. त्यामुळे मिथुन राशीचे लोक व्यवसायात चांगली कमाई करू शकतात. तसेच शेअर मार्केटमध्येही चांगला नफा मिळू शकतो.
कर्क: १२ एप्रिलपासून तुमचा चांगला काळ सुरू होऊ शकतो. कारण राहु ग्रह तुमच्या दशम भावात प्रवेश करेल. या स्थानाला नोकरी आणि करिअरचं स्थान म्हणतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पगारवाढ मिळू शकते. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात एखादी मोठा करार निश्चित होऊ शकते. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल आहे.
Mangal Gochar: ७ एप्रिलला मंगळ ग्रह करणार गोचर, ‘या’ राशींचं नशीब फळफळणार
मीन: राहू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण राहु ग्रह तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करेल. या स्थानाला धन आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. यावेळी तुमची शक्ती वाढेल आणि गुप्त शत्रूंचा नाश होईल. जर तुम्ही शेअर्स आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवले तर ते गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे.