वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत आहे. १२ एप्रिल रोजी राहू ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह मानलं जातं. तसेच वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला कठोर वाणी, शेअर्स, प्रवास, त्वचा रोग, धार्मिक यात्रा, परदेश प्रवास, महामारी, राजकारण इत्यादींचा कारक म्हटले आहे. राहूचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. पण चार राशी आहेत, ज्यांना शेअर्स आणि व्यवसायात विशेष फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथुन: राहु ग्रह तुमच्या राशीत अकराव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्त्रोतही निर्माण होतील. त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची अपेक्षा आहे. जे लोक प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढेल. व्यापार क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी देखील हे संक्रमण उत्कृष्ट ठरेल. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा अंमल आहे, त्यामुळे जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. लाभाची चिन्हे आहेत.

कर्क: राहूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. कारण राहु ग्रह तुमच्या राशीतून दहाव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला कर्म आणि करिअरचे स्थान म्हणतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचे खूप कौतुक होईल. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल आहे.

वृश्चिक: राहूचे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. कारण तुमच्या राशीत राहू सहाव्या स्थानात प्रवेश करेल. हे स्थान शत्रू आणि आजाराचे स्थान आहे. त्यामुळे या काळात तुमच्या गुप्त शत्रूंचा नाश होईल. तसेच, या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. शेअर बाजारात तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीवर मंगल ग्रहाचे राज्य आहे. त्यामुळे या काळात लष्कर, इंजिनीअर, पोलीस, मेडिकल लाईनशी निगडीत असणाऱ्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. कुंडलीच्या पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या घरात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह भ्रमण करतो तेव्हा करिअर आणि नवीन नोकरीत बदल होतो.

Shani Dev 2022: अडीच वर्षांनंतर शनिदेव राशी बदलणार, या राशींना मिळणार दिलासा

कुंभ: राहूच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक शनिशी संबंधित काम करत असतील जसं की, तेल, लोखंडाचे काम. त्यांना गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्ही संपत्ती जमा करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. कुंभ राशीवर शनिदेवाचे राज्य असते आणि ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि शनिदेवाशी मैत्री आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना शेअर बाजारात अचानक फायदा होऊ शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu grah gochar in mesh rashi on 12 april 2022 rmt
Show comments