Rahu Ketu Gochar 2025 : नवीन वर्षाला आता फक्त काही महिने शिल्लक आहे. या वर्षी सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे राहु आणि केतु सुद्धा त्यांच्या स्थितीमध्ये बदल करत आहे. याचा काही राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो तर काही लोकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
२०२५ मध्ये राहु आणि केतुच्या स्थितीचा विचार केला तर दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. राहु मीन राशीतून कुंभ राशीमध्ये विराजमान होणार तर केतु कन्या राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आज आपण २०२५ मध्ये राहु आणि केतु कोणत्या राशीसाठी फायद्याचे ठरणार आहे, हे जाणून घेणार आहोत. (Rahu Ketu Gochar 2025 : Zodiac Signs Poised for Wealth and Prosperity)
पंचांगनुसार, राहु आणि केतु दोन्ही ग्रह १८ महिन्यानंतर राशी परिवर्तन करतात. केतु १८ मे सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे तसेच राहु १८ मे सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. राहु आणि केतु या राशींमध्ये १८ महिने राहतील.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
मिथुन राशीमध्ये केतु तिसऱ्या भावामध्ये आहे आणि राहु नवव्या भावात आहे. त्यामुळे नवीन वर्ष या राशीसाठी उत्तम राहीन. या लोकांना नशीबाची साथ मिळेल. खूप काळापासून यांचे अडलेले काम पूर्ण होईल तसेच ज्या कामासाठी खूप काळापासून तुम्ही मेहनत घेत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. करिअरच्या क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतो. वरिष्ठांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. हे लोक अध्यात्माकडे वळतील यामुळे हे लोक धार्मिक ठिकाणी भेट देतील. कुटुंबाबरोबर वेळ घालवतील. हे लोक वाहन खरेदी करू शकतात.
हेही वाचा : नवरात्रीमध्ये मिळणार बक्कळ पैसा; केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
मकर राशी (Makar Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी राहु केतुचे राशी परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये राहु तिसर्या स्थानावर आहे आणि केतु अष्टम भावात आहे. त्यामुळे नवीन वर्ष या राशीसाठी फायद्याचे ठरू शकते. या लोकांना मोठा धनलाभ मिळू शकतो. शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतील. हे लोक अध्यात्माकडे वळतील. धन संपत्ती जमा करण्यात यशस्वी होतील.
धनु राशी (Dhanu Zodiac)
राहु केतु गोचर २०२५ या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये राहु तिसऱ्या स्थानावर आहे आणि केतु नवव्या स्थानावर आहे. भाग्य स्थानावर केतु असल्याने या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. धार्मिक कार्यात या लोकांचे मन रमणार. हे लोक तीर्थ यात्रामध्ये जाऊ शकतात. पूजा पाठमध्ये हे लोक जास्त वेळ घालवतील. मित्र मैत्रीणींबरोबर चांगला वेळ घालवतील. खर्च करणे टाळावे लागेल. कामाच्या ठिकाणी तणाव वाढेन पण हे लोक आरामात यातून मार्ग काढणार.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)