Rahu Ketu Gochar: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. राहू-केतू ४ महिन्यानंतर राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे मे महिन्यानंतरचा काळ काही राशीच्या व्यक्तींना अधिक शुभ सिद्ध होईल.
राहू-केतूचे राशी परिवर्तन ठरेल फायदेशीर (Rahu Ketu Gochar)
मेष
पुढील ४ महिन्यांचा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.
धनु
या काळात धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)