Rahu Nakshatra Gochar 2024 : राहुला छाया ग्रह म्हणतात. जेव्हा राहु राशी परिवर्तन करतो, त्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. राहु ग्रह हा रहस्यमयी असतो. राहु एका राशीत १८ महिने विराजमान राहतो. जर तुमच्या कुंडलीमध्ये राहुची स्थिती मजबूत असेल तर लोकांना याचा चांगला फायदा होतो. राहु एका ठराविक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. सध्या राहु उत्तराभाद्रपदमध्ये विराजमान आहे आणि डिसेंबर पर्यंत याच नक्षत्रामध्ये विराजमान राहणार आहे. अशात राहुच्या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर दिसू शकतो. जाणून घेऊ या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये राहु विराजमान असल्यामुळे कोणत्या राशींवर याचा परिणाम दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहु १६ ऑगस्ट सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांवर उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये प्रवेश केला आहे आणि २ डिसेंबर पर्यंत याच पदावर ते विराजमान राहणार आहे. १६ मार्च २०२५ पर्यंत राहु याच नक्षत्रामध्ये विराजमान राहणार. २७ नक्षत्रांमध्ये उत्तराभाद्रपद हा २६ वा नक्षत्र आहे आणि याचा स्वामी ग्रह शनि आहे. शनि आणि राहुमध्ये मैत्री दिसून येते. त्यामुळे काही राशींना याचा चांगला फायदा दिसू शकतो.

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

राहु शनिच्या नक्षत्रामध्ये विराजमान असणे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीमध्ये आठव्या स्थानावर राहु आणि लग्न भावमध्ये शनि आहे. अशा वेळी या लोकांनी दुप्पट फायदा मिळू शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धन धान्याचा लाभ घेता येईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. कुटुंबाबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकता. कठीण समस्या दूर होतील आणि पदरी यश मिळेल. जर तुम्ही धन संपत्ती गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे.

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी राहु आणि शनिच्या नक्षत्रामध्ये जाणे लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये शनि दहाव्या आणि राहु अकराव्या स्थानावर विराजमान आहे. अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याची चांगली संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. या लोकांना धनलाभ मिळू शकतो. राहुच्या प्रभावामुळे या लोकांची अनेक इच्छा पूर्ण होतील. पैशांची बचत करण्यात हे लोक यशस्वी होतील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. नोकरीमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

कन्या राशी (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी राहु नक्षत्र परिवर्तन करणे लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतील. बिघडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊन सुख समृद्धी लाभेल. करिअरमध्ये या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नतीबरोबर पगारवाढ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)