Shani Rahu Guru Positive Effect: अवघ्या काही दिवसांत नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षांत अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. यातच ज्योतिष्यशास्त्रानुसार, २०२४ मधील मे महिन्यात देव गुरु आपल्या स्वराशीत म्हणजेच मेष राशीत विराजमान राहणार आहेत. यानंतर वृषभ राशीत प्रवेश करतील. सोबतच शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशातच विराजमान राहणार असून याच राशीत मार्गी आणि वक्री होणार आहेत. तर राहूने ३० आॅक्टोबर २०२३ ला मीन राशीत प्रवेश केलाय. २०२४ मध्ये राहू संपूर्ण वर्ष मीन राशीत राहणार आहेत. २०२४ मध्ये काही राशींसाठी शनि, राहू आणि गुरूची ही स्थिती भाग्यशाली ठरु शकते. ही स्थिती तब्बल एक हजार वर्षांनी जुळून येत असल्याने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ मध्ये ‘या’ राशी होणार श्रीमंत?

मेष राशी

मेष राशींच्या मंडळीसाठी येणारे नवीन वर्ष २०२४ फायद्याचे ठरु शकते. आर्थिक अडचणी दूर होऊन हातात पैसा येण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतात. संपत्ती आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणेही मार्गी लागू शकतात. तुम्हाला यश मिळविण्यासाठी नवीन संधी देखील मिळू शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : ५० वर्षांनंतर मित्र ग्रहांचा संयोग; फेब्रुवारीपासून ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? वर्षभर मिळू शकतो बक्कळ पैसा )

कुंभ राशी

कुंभ राशींच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष नवीन संधी घेऊन येणारे ठरु शकते. तुमची मेहनत तुम्हाला उत्तम यश मिळवून देऊ शकते. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचा बँक बॅलन्स वाढवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. येणाऱ्या नवीन वर्षात व्यावसायिकांचंही नशीब चमकण्याची शक्यता आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या नव्या वाटा सापडू शकतात. तुम्ही जीवनात ज्या संधीच्या प्रतिक्षेत आहात, ती तुम्हाला लवकरच मिळू शकते.

मीन राशी

२०२४ हे येणारे नवीन वर्ष मीन राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. नोकरदार लोकांचे चांगले उत्पन्न आणि प्रभाव वाढू शकतो. कुठेतरी अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. एखादे प्रलंबित सरकारी काम पूर्ण होऊ शकते. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळू शकतो. कुटुंबीयांशी संबंध मधुर होऊन जुन्या कटुता दूर होऊ शकतात. संतती सुखाची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu shani guru sanyog 2024 postive impact of these three zodiac signs bank balance to raise money pdb