Rahu gochar positive effect: ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला पापी आणि छाया ग्रह म्हटले जाते. इतर ग्रहांप्रमाणेच राहूचे देखील प्रत्येक ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. या परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. सध्या राहू शनीच्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान असून तो १६ मार्चपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रातील राहूचे परिवर्तन पुढील राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहूचे नक्षत्र परिवर्तन ठरणार फायदेशीर

वृषभ

वृषभ राशीच्या राहूचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल ठरेल. या काळात या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. शारीरिक आणि मानसिक तणावही कमी होईल, वैवाहिक जीवनही सुखमय राहील.

कुंभ

राहूचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मार्चपर्यंत तुमच्यावर शनीची कृपा राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल.

हेही वाचा: येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार

मीन

मीन राशीसाठी देखील राहूचे नक्षत्र परिवर्तन अनेक बदल घडवून आणेल. या काळात तुमचे व्यक्तित्व सुधारेल. कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा शोध संपेल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahus entry into saturns nakshatra will give these three signs the pleasures of money and wealth sap