Akshaya Tritiya Shubh Yog 2025: अक्षय्य तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय्य तृतीया असते. यंदा अक्षय्य तृतीयेची तिथी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार ३० एप्रिल (बुधवार) रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. धनाची देवी लक्ष्मीला समर्पित हा दिवस आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. योगायोगाने शंभर वर्षांनी अक्षय्य तृतीयेलाच तब्बल ६ शुभ योग जुळून आले आहेत. या दिवशी गजकेसरी राजयोग, मालव्य राजयोग, रवियोग, चतुर्ग्रही योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि लक्ष्मी नारायण राजयोग यांसह अनेक दुर्मिळ आणि अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहेत. अशा स्थितीत, ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

अक्षय्य तृतीयेला ‘या’ राशींना देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा?

मकर

ज्योतिषशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात चांगला लाभ मिळू शकतो. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतो. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. लवकरच तुमच्या घरी आनंदाची बातमी येऊ शकते.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढू शकतो. तुमची योजना तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.  तुम्हाला व्यवसाय भागीदारीत फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होऊन तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकतो. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसू शकते. तसेच, परदेशी यात्रेला जाण्याचे योग देखील जुळून येऊ शकतात. तुमच्या हाती घेतलेल्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत मोठी वाढ देखील होऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)