Raksha Bandhan 2022 Shubh Muhurta: आज ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे त्याची भरभराट व्हावी यासाठी बहिणी देवाकडे प्रार्थना करतात आणि असं म्हणतात की या पवित्र दिवशी देव सुद्धा बहिणीचं ऐकतो. हे जर खरे असेल तर शुभ मुहूर्तावर आपण भावाला राखी बांधल्यास हे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, रक्षाबंधनसाठी ११ ऑगस्टला सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होऊन १२ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. मात्र या दरम्यान जवळपास एक- दीड तास राहू काळ असणार आहे.
पंचांगानुसार ११ ऑगस्टला दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी राहू काळ सुरु होऊन दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत चालू राहील. शक्य झाल्यास या वेळेत भावाला राखी बांधणे टाळावे. तर सकाळी ९ वाजून १८ मिनिट ते १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत सुद्धा कुलिक काळ सुरु असणार आहे. दुपारी ३ वाजून ३२ मिनिटे ते संध्याकाळी ४ वाजून २३ मिनिटांच्या दरम्यान दुमुहूर्त असल्याने ही वेळ सुद्धा रक्षाबंधनासाठी अशुभ आहे.
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता?
रक्षाबंधनासाठी अभिजीत मुहूर्त म्हणजेच दुपारी १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत सुरु राहणार काळ हा अत्यंत शुभ असेल तर संध्याकाळी सुद्धा ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते ८ वाजून २० मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी अमृत योग आहे.
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनासाठी अशी सजवा राखीची थाळी; ‘या’ वस्तू चुकूनही विसरू नका
रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकांपासून दूर राहणारे भाऊ बहीण सुद्धा आवर्जून भेटून सण एकत्र आनंदाने साजरा करतात. यावेळी कधी घरी जाण्याची घाई किंवा कामाची गडबड असेल तर वेळ न पाहता सोयीने राखी बांधली जाते. अशावेळी शुभ मुहूर्ताचे पालन करता आले नाही तर निदान अशुभ काळात राखी बांधणे टाळावे असा सल्ला दिला जातो.
(टीप- येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)