Raksha Bandhan 2023: हिंदू पंचांगानुसार श्रावण मासातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. याच दिवशी मासेमार बांधवांसाठीचा खास दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. यंदा अधिक मासामुळे भावा- बहिणीच्या हक्काचा रक्षाबंधन सण काही दिवस पुढे ढकलला गेला होता. यंदा ३० ऑगस्टला सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे. यानुसार भारतात ३० ऑगस्टला रक्षाबंधन असणार आहे. ३० ऑगस्टची ग्रहस्थिती पाहता या शुभ दिवसाच्या मुहूर्तावरच एक खास योग सुद्धा जुळून आला आहे. सुकर्मा, धृती व अतिगंड हे तीन महत्त्वाचे राजयोग ३० ऑगस्टला तयार होत आहेत. याच दिवशी चंद्र व शनी कुंभ राशीत एकत्र येत आहेत. या स्थितीनुसार काही राशींना सतर्क राहण्याची सुद्धा गरज आहे. दुसरीकडे चार अशा राशी आहेत ज्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी प्रचंड मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.
रक्षाबंधनाला ‘या’ राशींच्या भावंडांना होईल बक्कळ धनलाभ?
मेष रास (Aries Zodiac Horoscope)
मेष राशीच्या मंडळींसाठी रक्षाबंधनाचा दिवस अत्यंत खास ठरू शकतो. तुम्हाला कुटुंबीयांची साथ लाभल्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्ष कृतीत अवलंबता येतील. प्रलंबित कामे मार्गी लागल्याने आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला काही इच्छा सुद्धा पूर्ण करता येऊ शकतात. नोकरदार मंडळींना पगारवाढ व पदोन्नत्तीचे योग आहेत. कुटुंबाला एकत्र प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे नात्यातील गोडवा व जवळीक वाढू शकते.
कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)
व्ययस्थानातील रवी, मंगळ, बुध यांच्या भ्रमणामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी धोपट मार्ग स्वीकारावा. आडमार्गाने जाल तर अडखळून पडाल. विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. जोडीदाराच्या साथीने चर्चेअंतीच कुटुंबातील महत्वाचे निर्णय पक्के करावेत. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला धनलाभ मिळवून देऊ शकतो.
मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)
स्थावर मालमत्तेसंबंधित कागदपत्रे, कोर्टाची कामे हळूहळू मार्गी लागतील. कायदेशीर पद्धतीने पाठपुरावा केलात तरच लाभदायक ठरेल. व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक कामाची व्याप्ती वाढवेल. शनी गुरूच्या साथीने विद्यार्थी वर्गाला भरघोस यश मिळेल. भावंडांची मेहनत कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडेल.
हे ही वाचा<< शनीदेव येत्या ३ दिवसात ‘या’ राशींना देणार अमृतरूपी वरदान? श्रीमंतीचा ‘समसप्तक राजयोग’ तुमच्या राशीत आहे का?
मीन रास (Pisces Zodiac Horoscope)
शुक्राची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी वक्री होणार आहे. तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होऊ शकते. त्याचबरोबर परदेशातूनही तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतात. तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या योग्य संधी मिळू शकतात. भावंडांच्या साथीने नवा व्यवसाय व गुंततवणूक करता येऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)