भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला आता अवघा आठवडा उरला आहे. यंदा भाद्र असल्याने हा सण ३० आणि ३१ ऑगस्ट असे दोन दिवस साजरा केला जाणार आहे. या वर्षी २०० वर्षांनंतर बुधादित्य योग, रवि योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी २०० वर्षांनंतर शनि आणि गुरू स्वतःच्या राशीत प्रतिगामी अवस्थेत बसतील, त्यामुळे काही राशींवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. हा दुर्मिळ योग तीन राशींचे नशीब उजळण्यासाठी येत आहे. ज्योतिष्यांच्या मते, या तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात लॉटरी लागण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
‘या’ राशींचे लोक होऊ शकतात भाग्यवान! मिळू शकतो पैसा आणि प्रगती
सिंह राशी
यंदाचे रक्षाबंधन सिंह राशींच्या लोकांचे नशीबाचे दार उघडू शकते. या काळात माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असू शकतो. या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. कामात यश मिळू शकतो. धनलाभही होऊ शकतो. तुम्हाला कामात यश आणि सन्मानही मिळू शकतो.
(हे ही वाचा : सूर्यदेव स्वराशीत; ३० दिवस ‘या’ राशीचे अच्छे दिन? तर ‘या’ राशींसाठी ठरु शकतात तापदायक दिवस, राहावे सतर्क! )
धनु राशी
यावेळचे रक्षाबंधन धनु राशींच्या लोकांसाठी खूप गोड ठरु शकते. या काळात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या माध्यमातून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
मिथुन
रक्षाबंधनला बनलेल्या दुर्मिळ योगायोगामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनातून पैशाचे संकट दूर होऊ शकते. अचानक धनलाभ होऊन तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल करु शकता. नवीन व्यवसायात फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकता. नवीन कामात प्रवेश करणे फायदेशीर ठरु शकते. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)