Raksha Bandhan 2024 Grah Sanyog: रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचा मानला जातो. हिंदू पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन ही तिथी १९ ऑगस्टला साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या रक्षाबंधनाला ग्रह-ताऱ्यांची स्थिती अशी आहे की एक नाही तर अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा शुभ संयोगांचा दुर्मिळ संयोग सुमारे १८० वर्षांनंतर होत आहे. सर्वप्रथम, श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी होत आहे. १९ ऑगस्टला असलेल्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवार आहे. तसेच या रक्षाबंधनाच्या दिवशी बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग, शशयोग इत्यादी योग तयार होत आहेत. या योगांचा सर्व १२ राशींवर परिणाम होईल. भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण रक्षाबंधन पाच राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी राखीचा सण खूप खास असेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी रक्षाबंधन शुभ ठरू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा