Raksha Bandhan Astrology : ज्योतिषशा्स्त्रानुसार, बुध एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. बुध ग्रह बुद्धी, ज्ञान आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो. बुध या वेळी सिंह राशीमध्ये विराजमान आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून २२ मिनिटांनी बुध कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. यानंतर यानंतर ४ सप्टेंबरला बुध सिंह राशीमध्ये कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशाप्रकारे बुध एका महिन्यात तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. (Raksha bandhan astrology news zodiac signs will get money and wealth after two days of Raksha bandhan)
बुध ग्रह कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर दिसून येईल. पण काही राशींच्या लोकांना याचा थेट परिणाम दिसून येईल. या वर्षी रक्षाबंधनचा सण १९ ऑगस्टला आहे. रक्षाबंधन नंतर बुध ग्रह गोचर करणार आहे. जाणून घेऊ या, कोणत्या राशींना याचा फायदा दिसून येईल.
कन्या राशी
बुध गोचरचा कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल. व्यवसाय करणार्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक वृद्धी होईल. या काळात या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या गोचरमुळे चांगला नफा मिळू शकतो. कोणत्याही गुंतवणूकीत या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. नवीन स्त्रोतद्वारे धनसंपत्ती मिळू शकते. कामातील अडचणी दूर होतील. या लोकांना कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जीवनात सुख समृद्धी मिळेल. आर्थिक संकट दूर झाल्याने मानसिक तणाव कमी होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे.
कुंभ राशी
बुध गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद दिसून येईल. या काळात या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येईल. या लोकांना यात्रेचा योग जुळून येईल. प्रत्येक कामात यश मिळू शकते. अचानक या लोकांना धनलाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)