हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्त्व आहे. रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा केला जातो. यावेळी रामनवमीला रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग हा त्रिवेणी योग तयार होत आहे. या तिन्ही योगांमुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. पौराणिक मान्यतेनुसार श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात झाला तेव्हा चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्रात कर्क राशीचा उदय झाला आणि मंगळ, शुक्र, सूर्य, शनि आणि गुरु हे पाच ग्रह उच्च स्थानात होते आले. पुराणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म याच दिवशी झाला होता. या दिवशी राम आणि सीता यांच्यासोबतच देवी दुर्गा आणि भगवान हनुमानाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच चैत्र नवरात्रीचीही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते. जाणून घ्या राम नवमीची पूजा, मुहूर्त आणि कथा

राम नवमी २०२२ शुभ मुहूर्त

  • चैत्र शुक्ल नवमीची तारीख: १० एप्रिल, रविवार, दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी
  • चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त: ११ एप्रिल, सोमवार, पहाटे ३ वाजून १६ मिनिटांनी
  • रामजन्मोत्सवाचा शुभ मुहूर्त: सकाळी ११ वाजून ६ मिनिटं ते दुपारी १ वाजून ३९ मिनिटं
  • दिवसाची शुभ वेळ: दुपारी १२ वाजून ४ मिनिटं ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत

राम नवमी पूजन पद्धत:

राम नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. प्रार्थनास्थळाची नीट स्वच्छता करावी. आता हातात अक्षता घेऊन संकल्प करा. यानंतर भगवान श्रीरामाची पूजा सुरू करा. तसेच रोळी, चंदन, उदबत्ती, सुगंध इत्यादींनी षोडशोपचार पूजा करावी. पूजेमध्ये गंगाजल, फुले, ५ प्रकारची फळे, मिठाई इत्यादींचा वापर करावा. भगवान रामाला तुळशीची पाने आणि कमळाची फुले अर्पण करा. पूजा केल्यानंतर आपल्या इच्छेनुसार रामचरितमानस, रामायण किंवा रामरक्षास्तोत्राचे पठण करावे. प्रभू रामाच्या आरतीने पूजा पूर्ण करा.

Guru Gochar: गुरु ग्रह १३ एप्रिलला करणा स्व-राशीत प्रवेश, या राशींसाठी ‘अच्छे दिन’

जाणून घ्या काय आहे राम नवमीचा इतिहास:

हिंदू धर्मानुसार प्रभू राम भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. महाकाव्य रामायणानुसार, अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या, परंतु बराच काळ लोटला तरी त्याला कोणत्याही पत्नीकडून संतती होत नव्हती. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रेष्टी यज्ञ करण्यास सुचवले होते. यानंतर राजा दशरथाने शृंगी ऋषींसोबत हा यज्ञ केला. यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी दशरथाच्या तीन पत्नींना खीरची वाटी खायला दिली. काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्ये हिने रामाला जन्म दिला, तर कैकेयीने भरताला, सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला. रावणाचा नाश करण्यासाठी रामाचा जन्म पृथ्वीवर झाला.