Ram Navami 2025 Shubh Yog: हिंदू पंचांग नुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्त्व आहे. यंदाची रामनवमी ही ६ एप्रिल २०२५ रोजी रविवारी साजरी करण्यात येत आहे. भगवान रामाचा जन्मउत्सव यादिवशी भाविक मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. देशभर रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या दिवशी भगवान रामासाठी भक्त उपवास ठेवतात त्यांची मनोभावे पूजा करतात. यावर्षी १३ वर्षांनी रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे. यावर्षी रामनवमीला रवि पुष्य योगाचा योगायोग घडत आहे. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि सुकर्मा योग जुळून आले आहेत. या योगांना ज्योतिष शास्त्रामध्य अत्यंत शुभ आणि लाभकारी मानले जाते. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर भगवान रामाची विशेष कृपा असणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींच्या लोकांवर प्रभू श्रीरामाची असणार कृपा?
मेष राशी
मेष राशीच्या लोकांवर श्रीरामाची विशेष कृपा असू शकते. या राशीच्या लोकांना येत्या दिवसात करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळून संपत्तीतही वाढ होऊ शकते.
कर्क राशी
श्रीराम कृपेने कर्क राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. इमारत आणि वाहनातून आनंद मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार असून त्यांची कामे मार्गी लागू शकतात. एवढंच काय तर त्यांचा अडकलेला पैसाही त्यांनी मिळण्याची शक्यता आहे.
धनू राशी
श्रीराम कृपेने धनू राशीच्या लोकांना बहुतेक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या राशीचे लोक जे व्यापारी आहेत, त्यांना मोठा आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)