25th March 2024 Rang Panchami Horoscope: आज दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी संपुष्टात येणार असून फाल्गुन कृष्ण प्रतिपदा सुरु होणार आहे. आजच्या दिवशी देशभरात धुलिवंदनाचा उत्साह व ऊर्जा पाहायला मिळत आहे. आज हस्त नक्षत्रात वृद्धी योग कायम असणार असून आठवड्याची सुरुवातच आनंदी ढंगात होण्याचे संकेत आहेत. आजच्या सोमवारी तुमच्या राशीच्या भाग्य आनंदाच्या व श्रीमंतीच्या रंगाने माखणार की सारी धुळवड होणार, पाहा मेष ते मीन १२ राशींचे भविष्य

रंगपंचमी विशेष: २५ मार्च २०२४ राशी भविष्य

मेष:-कौटुंबिक प्रगतीचा विचार कराल. हातातील कामात यश येईल. एखादी नवीन संधी चालून येईल. नवीन मित्र जोडाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
aquarius Yearly Horoscope 2025 in Marathi | kumbha Rashibhavihsya 2025 in Marathi
Aquarius Yearly Horoscope 2025 : कुंभ राशीला नोकरी, व्यवसायात कधी होणार लाभ? आरोग्य ते नातेसंबंध… कसे असेल वर्ष; वाचा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे भविष्य
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
Makar Rashi Bhavishya 2025 in Marathi
Capricorn Yearly Horoscope 2025: मकर राशीला वर्षभर गुरुची साथ! धनलाभासह शिक्षण, नोकरीत होतील मोठे बदल; सोनल चितळेंनी सांगितले १२ महिन्यांचे भविष्य

वृषभ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. दिवस चैनीत घालवाल. निसर्ग सान्निध्यात रमून जाल. घरात कर्तेपणाचा मान मिळेल. तिजोरीत भर पडेल.

मिथुन:-सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. घरातील लोकांच्यात वेळ घालवाल. आवडी-निवडीबद्दल दक्ष राहाल. घरातील कामात हातभार लावाल. पत्नीची प्रेमळ साथ मिळेल.

कर्क:-आपल्याच मर्जीने वागणे ठेवाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. तुमच्यातील अरसिकता वाढेल. वादाचा मुद्दा उकरून काढू नका. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी.

सिंह:-वैचारिक स्थैर्य जपावे. अडचणीवर मात करता येईल. मानसिक उभारी ठेवावी लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. फार विचार करत बसू नका.

कन्या:-जोडीदाराचे वर्चस्व राहील. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. सामाजिक कामात हातभार लावाल. तुमची सामुदायिक प्रतिष्ठा वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

तूळ:-घरगुती कलह वाढू देऊ नका. सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. अती अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

वृश्चिक:-भावंडांना मदत करावी लागेल. मित्रांचे सहकार्य घ्यावे लागेल. नातेवाईक नाराज होऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.

धनू:-हातातील कामे खोळंबू शकतात. कौटुंबिक अडचण सोडवता येईल. जुगारातून लाभ संभवतो. फसवणुकीपासून सावध राहा. आर्थिक उलाढाली सजगतेने कराव्यात.

मकर:-कामाचा उत्साह कायम ठेवावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पीत्त विकार बळावू शकतात. कामातील प्रतिकूलता प्रयत्नाने दूर करावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.

कुंभ:-अघळ-पघळ गप्पा माराल. वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. कामाचा फार ताण घेऊ नये. जबाबदारी उत्तम रित्या पेलाल. घराची स्वच्छता काढाल.

हे ही वाचा<< होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी

मीन:-इतरांशी वाद वाढू शकतो. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठांना नाराज करू नका. मनाजोगी खरेदी करता येईल. घराबाहेर वावरतांना सावध राहावे लागेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader