Dhanteras 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या धनत्रयोदशीला अनेक शुभ योग तयार होणार आहेत. ज्याचा काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. हिंदू धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने-चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी धनत्रयोदशीचा दिवस खूप खास आहे, कारण यावेळी अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. असा योगायोग तब्बल ५९ वर्षांनंतर घडल्याचं मानलं जात आहे. या धनत्रयोदशीला गुरु त्याची राशी मेषमध्ये असेल, तर शुक्र त्याच्या अनुकूल राशी कन्यामध्ये असणार आहे आणि सूर्यदेव तूळ राशीत विराजमान आहेत. यासह जवळपास ३० वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत विराजमान होणार आहेत ज्यामुळे शशयोग निर्माण होत आहे. देवांचा गुरू बृहस्पति आपल्या सप्तम दृष्टीतून सूर्याकडे पाहत आहेत. हा योग धनत्रयोदशीला तयार होत असल्याने काही राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो, तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष रास

गुरू मेष राशीमध्ये विराजमान असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तर या वेळी तुमचे आरोग्यही चांगले राहू शकते. नोकरदारांना फायदा आणि व्यवसायिकांना भरपूर नफा मिळू शकतो.

मिथुन रास

ग्रहांच्या स्थितीनुसार मिथुन राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, ज्यामुळे तुमची प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊन तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. तुमचे काम पाहून तुमचे प्रमोशन होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांनाही नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.

हेही वाचा- एका वर्षानंतर एकत्र आलेत मंगळ आणि सूर्यदेव; ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता

मकर रास

मकर राशीच्या लोकांना देखील या काळात बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या कष्याचे पूर्ण फळ मिळण्यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारीही मिळू शकते. कर्जातून सुटका झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला व्यवसायातही मोठी रक्कम मिळू शकते. शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता, वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकांना या काळात यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare yoga is happening on dhantrayodashi will the fate of these zodiac signs change chances of immense wealth with the grace of lakshmi jap