Parivartan Rajyog 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा वेळोवेळी गोचर करून आपले स्थान बदलतात त्यानुसार त्यांच्या प्रभावकक्षेत येणाऱ्या राशींचे नशीब सुद्धा बदलत असते. जेव्हा एकाहून अधिक ग्रह गोचर कक्षेत एकत्र येतात तेव्हा त्यातून अनेक शुभ- अशुभ राजयोग निर्माण होत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर सुद्धा कमी- अधिक प्रमाणात दिसून येत असतो. काही योग हे अत्यंत दुर्मिळ असतात जे कित्येक वर्षातून कधीतरी तयार होत असतात व त्यांचा प्रभावही तितकाच दमदार असतो. येत्या नववर्षाच्या सुरवातीला सुद्धा असाच एक अगदी दुर्लभ योग तयार झाला आहे.
२७ डिसेंबरला म्हणजेच बुधवारी हा राजयोग निर्माण झाला आहे. मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. धनु राशीवर गुरु ग्रहाचे स्वामित्व आहे. अशातच मंगळाचे राशी परिवर्तन झाल्याने गुरु व मंगळाची युती होत असल्याने ‘परिवर्तन राजयोग’ निर्माण होत आहे. या योगाने प्रभावित राशींना येत्या काळात अत्यंत लाभदायक स्थिती अनुभवता येणार असून काही विशेष रूपात खजिन्याची चावी हाती लागणार आहे. नेमक्या या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीच्या मंडळींसाठी येणारा कालावधी हा लाभदायक ठरू शकतो. तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळू शकते, ज्याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर दिसून येऊ शकतो. आपल्या योजना पूर्णत्वास जाऊ शकतात ज्यामुळे सतत होणारी चीडचड कमी होऊ शकते. या कालावधीत प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीची संधी मिळू शकते पण व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. धार्मिक कार्यात सहभाग वाढू शकतो ज्यामुळे तुम्हाला अध्यात्माची गोडी लागू शकते. तुम्हाला धनलाभाचा खजिना नोकरी बदलाच्या स्वरूपात मिळू शकतो.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
परिवर्तन राजयोग हा कन्या राशीच्या व्यावसायिकांना अधिक फायदेशीर ठरू शकतो. नवे संपर्क जोडले जातील. काही कालावधीपासून आपण काम सुरु करूनही ते पूर्ण होण्यास थानी येत होत्या. पण तेच अडथळे आता दूर होण्याची चिन्हे आहेत. यामुळे अडकून पडलेले धन सुद्धा परत मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना आपल्या संपर्कांमुळेच नोकरीची संधी मिळू शकते. तुमचे कष्ट इतरांच्या लक्षात येऊ लागतील त्यामुळे तुमच्यावरील विश्वास वाढू शकतो. तुमच्या बोलण्यामुळे संधींचा खजिना तुमच्या हाती लागू शकतो.
हे ही वाचा<< 28th December Bhavishya: मार्गशीर्ष गुरुवार व गुरुपुष्यामृत योग एकत्रच! मेष ते मीन पैकी तुमच्या राशीच्या भाग्यात काय?
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी व विवाहित मंडळींसाठी परिवर्तन राजयोग शुभ ठरू शकतो. समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो. विवाहित मंडळींना नात्यातील गोडवा वाढून प्रेम अनुभवता येऊ शकते. जोडीदाराच्या रूपात लक्ष्मी मातेचा आशीर्वादच मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाला प्रवासाची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेत यश हाती लागू शकते. तुमच्यासाठी प्रगतीचा खजिना खुला होणार आहे मात्र तुम्हाला सर्वतोपरी सक्रिय व सावध राहून प्रत्येक संधीचे सोने करावे लागणार आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)