2 August 2024 Panchang & Marathi Rashi Bhavishya:  २ ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) ला कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. शुक्रवारच्या या शुभ दिवशी अधोमुख नक्षत्र सकाळी १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. यादिवशी रात्री ११.४५ वाजेपर्यंत हर्ष योग राहील. तर राहू काळ सकाळी ११०.०७ वाजता सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असेल पण पण अन्यथा हा दिवस शुभ असेल. तर दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचे तर, अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल. आजच्या दिवशी तुमच्या राशीसाठी कोणती आनंदाची बातमी असेल किंवा अडचणी असतील, नेमका लाभ होऊ शकतो का? हे पाहू…

२ ऑगस्ट पंचांग व राशी भविष्य (Today’s Rashi Bhavishya)

मेष:- खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मानसिक क्षमता वाढीस लागेल.

pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
khirapat panchakhadya naivedya for ganapati festival quick recipe of making khirapat how to make khirapat
गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत; प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा, जाणून घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी
How to manage debt, debt, loan,
 कर्ज व्यवस्थापन कसे कराल?
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Malavya Rajyog
३६५ दिवसांनी मालव्य राजयोग; सप्टेंबरपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाचे येणार सुखाचे दिवस?
Ambadas Mohite, Rakshabandhan, Maharashtra, abuse-free society, gender equality, respect for women,
रक्षाबंधनाला, मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या देणार नाही, असे वचन…
ITR Refund Scam
ITR refund scam: करदात्यांनो रिफंडबाबत मेसेज, ईमेल येत आहेत? नव्या स्कॅमपासून सावधान!

वृषभ:- मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा.

मिथुन:- सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे.

कर्क:- विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह:- आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. खाजगी समस्या सामंजस्याने सोडवाल. कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हातातील संधी सोडू नका.

Read More Astology Rashi News : २०२५ पर्यंत मिळणार पैसाच पैसा; गुरू ग्रहाची वक्री चाल करणार कमाल ‘या’ तीन राशी होणार मालामाल

कन्या:- आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल.
भावनाप्रधान होऊ नका. तुमचे मनोबल वाढीस लागेल. हित शत्रूंवर मात करता येईल.

तूळ:- कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या. मित्राकडे मनमोकळे करावे. सकारात्मक परिवर्तन घडेल.

वृश्चिक:- काही निकष ठरवावे लागतील. शेजार्‍यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका. गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल.

धनू:- गरज समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील.

मकर:- वादाचे मुद्दे समोर आणू नका. भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. अकल्पित लाभाची शक्यता. वरिष्ठ अधिकार्‍यांची मदत मिळेल.

कुंभ:- अवाजवी खर्च वाढतील. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका. जुन्या आठवणी दाटून येतील. संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे.

मीन:- मुलांना अभ्यासात मदत कराल. काटकसर करावी लागू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वरिष्ठांशी ताळमेळ साधावा.

(– ज्योतिषी विद्याधर करंदीकर)