30 July Panchang & Marathi Rashi Bhavishya: आज ३० जुलै २०२४ (मंगळवार) रोजी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. आजच्या दिवशी कृतिका नक्षत्र जागृत असणार आहे. या दिवसातील शुभ मुहूर्तांविषयी सांगायचे झाल्यास, अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी समाप्त होईल, चंद्र आज वृषभ राशीत असेल. तर जुलै महिन्याचा शेवटचा मंगळवार मेष ते मीन राशीच्या व्यक्तींना कसा जाईल, कुणाला येतील संकटं अन् कुणासाठी असेल आनंदाचा दिवस हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० जुलै पंचांग व राशी भविष्य (30 July 2024 Rashi Bhavishya)

मेष:- जुनी येणी वसूल होतील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. दिवसभर प्रसन्नता राहील. घरगुती कामे मनाजोगी पार पडतील. पालकांचे शुभ आशीर्वाद मिळतील.

वृषभ:- आपल्या वागण्या बोलण्यात मृदुता दिसून येईल. थोडे कमी बोलण्यावर भर द्या. मनातील सर्व चिंता काढून टाकाव्यात. निर्भीडपणे कार्यरत राहावे. कामातून मिळणार्‍या फळाकडे फार महत्त्व देऊ नका.

मिथुन:- मानसिक स्थैर्य बाळगा. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. पैशांचा उपयोग गरजेसाठी करावा. कौटुंबिक चर्चा हिताची ठरेल. नियमित व्यवहारात खंड पडू देऊ नका.

कर्क:- गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर या. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. चूक मान्य करावी. नात्यातील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. भौतिक सुखावर खर्च कराल.

सिंह:- बक्षि‍सास पात्र व्हाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामे समाधानकारक रित्या पार पडतील. नवीन योजनांवर काम चालू करण्यास उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढीस लागेल.

कन्या:- घरात धार्मिक कार्यासंबंधी बोलणी कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील. ज्येष्ठ बंधुंचे सहकार्य लाभेल.

तूळ:-आपलाच विचार पारखून घ्यावा. जोडीदाराचा विचार जाणून घेऊन मगच प्रतिक्रिया द्या. विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्यास उत्साही राहतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.

वृश्चिक:- संपर्कातील लोकांचे सहकार्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. मन प्रफुल्लित व प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. एखादी नवीन ओळख होईल.

धनू:- मनाची चंचलता काबूत ठेवा. तुमचा सल्ला विचारात जाईल. व्यायामाची आवड निर्माण होईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. गुंतवणूक करताना सारासार विचार करा.

मकर:- गूढ विचारात रमून जाल. मुलांशी मन मोकळ्या चर्चा कराल. दिवस खिलाडु वृत्तीने घालवाल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. उगाचच विरोध दर्शवू नका.

कुंभ:- घरातील कामे आवडीने कराल. कौटुंबिक गोष्टींत अधिक वेळ घालवाल. हातातील अधिकारात वाढ होईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. भागीदारीत समाधानी राहाल.

मीन:- बरेच दिवस वाट पाहत असलेल्या उत्तराची प्रतीक्षा संपेल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. जबाबदारी वाढण्याची शक्यता. निसर्ग-सौंदर्यात रमून जाल. संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashi bhavishya 30 july panchang tuesday special marathi horoscope today by aries to pisces astrology zodiac sign affect family reletionship predicts success and responsibility horoscop sjr