28th September 2024 Horoscope and Panchang : आज २८ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी दुपारी २ वाजून २१ मिनिटांपर्यंत चालेल. त्याचप्रमाणे आज आश्लेषा नक्षत्रात सिद्ध योग जुळून आला आहे. आश्लेषा नक्षत्र दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत जागृत असेल तर रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. आज राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. त्याचप्रमाणे आज इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी शालिग्राम देवताची पूजा करण्याची पद्धत आहे. याचबरोबर आज शनिवारी एकादशी तिथी असलेल्यांचे श्राद्ध केले जाईल. तर पितृपक्षातील इंदिरा एकादशीचा कोणत्या राशीला होणार फायदा हे आपण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ सप्टेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ:- कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.

मिथुन:- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह:- मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या:- व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ:- आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रीत गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

धनू:- जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर:- लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ:- भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:- स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashi bhavishya and marathi panchang on 28th september indira ekadashi lucky for mesh to meen zodic signs read horoscope in marathi asp
Show comments