7th October 2024 Panchang & Rashi Bhavishya: ७ ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल पक्षातील उदया तिथी चतुर्थी आणि सोमवार आहे. चतुर्थी तिथी सोमवारी सकाळी ९.४८ पर्यंत राहील, त्यानंतर पंचमी तिथी सुरु होईल.७ ऑक्टोबर हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. या दिवशी आई स्कंदमातेची पूजा केली जाते. याचबरोबर आज ललिता पंचमीचे व्रत आहे, यानिमित्ताने माता ललिताची पूजा केले जाते, तसेच आज कुमारीकांचेही पूजन केले जाते. त्यांना नमस्कार करुन भेटवस्तू देत गोडधोड जेवण केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी संपूर्ण दिवस आयुष्मान योग असणार आहे जो मंगळवारी सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असेल. तसेच दुपारी २ वाजून २५ मिनिटांपर्यंत अनुराधा आणि प्रीति नक्षत्र जागृत असेल. आज अभिजीत मुहूर्त सकाळी ११.४५ पासून दुापारी १२.३२ पर्यंत आहे. तर राहुकाल दुपारी ४.३० ते ५.५७ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय चंद्र वृश्चिक राशीत असेल. नेमका ललिता पंचमीचा शुभ दिवस माँ दुर्गेच्या आशीर्वादाने मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल, आज कोणकोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणत्या राशींना नुकसान होईल, हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

७ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (7th October 2024 Rashi Bhavishya) 

मेष:- जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.

वृषभ:-उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.

मिथुन:-मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

कर्क:-स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

सिंह:-घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.

हेही वाचा – लक्ष्मीच्या कृपेने दिवाळीत ‘या’ राशींचे लोक होतील करोडपती! ३० वर्षांनंतर जुळून येणाऱ्या तीन राजयोगाने होईल भरभराट

कन्या:- कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

तूळ:- अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.

वृश्चिक:- केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.

धनू:- आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर:- आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ:- कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यावसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.

मीन:- नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashi bhavishya panchang 7th october navratri 2024 day 5 maa skandamata puja ayushman yog lalita panchami maa durga blessed mesh to meen with money love career job happy life sjr
Show comments