5th October Rashi Bhavishya & Panchang : आज ऑक्टोबर महिन्याचा पाचवा दिवस आहे. आज अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी शनिवारी दिवसभर आणि रात्री रविवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत चालेल. तसेच स्वाती नक्षत्र रात्री ९ वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर आजच्या दिवशी विष्कंभ योग जुळून येणार आहे. तर आजचा राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचप्रमाणे शनिवारी शारदीय नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. दुर्गा देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा, तर आज तिची पूजा केली जाईल. तर आज चंद्रघंटा देवीची कोणत्या राशीवर विशेष कृपा असणार आहे हे आपण जाणून घेऊ या…

५ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.

वृषभ:- आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.

मिथुन:- नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कर्क:- अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.

सिंह:- कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.

कन्या:- कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.

तूळ:- इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.

वृश्चिक:- लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.

धनू:- दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.

मकर:- जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.

कुंभ:- फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.

मीन:- कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashi bhavishya panchang on 5th october navratri third day chandraghanta devi bring mesh to meen happy love life read horoscope in marathi asp
Show comments