9th October Rashi Bhavishya & Panchang : आज ९ ऑक्टोबर २०२४ रोजी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील. तर ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत शोभन योग तर ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र जागृत असणार आहे. आजचा राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचप्रमाणे आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीचा सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाईल. दुर्गामातेचे सातवे रुप कालरात्रीची पूजा केल्याने रोगांचा नाश होतो, शत्रूंवर विजय प्राप्त होतो, ग्रहांचे अडथळे, भय दूर होते असे मानले जाते. तर आज कालरात्री देवी कोणत्या राशीसाठी सुख-समृद्धी घेऊन येणार हे आपण जाणून घेऊ या…

९ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. आजचा दिवस चांगला जाईल. समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील. आपले कौतुक केले जाईल.

वृषभ:- तिखट पदार्थांचे सेवन करू नका. व्यवसायात तडजोड करावी लागेल. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल.

मिथुन:- आपला विचार जवळच्या व्यक्तीसमोर मांडा. दिवस उत्साहात जाईल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा. कोणाबद्दलही वाईट चिंतू नका. सारासार विचार करून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

कर्क:- नोकरी, व्यवसायात घाई टाळावी. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल. यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. जनसंपर्कात वाढ होईल.

सिंह:- शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव दिसून येईल. परोपकाराची भावना प्रबळ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. आत्मविश्वासाने केलेली कामे यशकारक ठरतील.

कन्या:- घरासाठी नवीन खरेदी कराल. स्पर्धेत यश मिळेल. आजचा दिवस शुभ असेल. कष्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मन प्रसन्न राहील.

तूळ:- नातेवाईकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाने मुलाखत द्या. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:- मित्रांशी दुरावलेले संबंध सुधारतील. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. मुलांच्या कृतीने मान उंचावेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

धनू:- आजचा दिवस शुभ ठरेल. हातातील कामात यश येईल. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. कठोर मेहनतीने मनोकामना पूर्ण कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील.

मकर:- कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू नका. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. फार विचार करण्यात वेळ घालवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नको त्या प्रलोभनात अडकू नका.

कुंभ:- महत्त्वाच्या निर्णयात गोंधळू नका. स्वत:च्या कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा. मिळकत वाढीस लावण्याचे मार्ग शोधाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मीन:- हातातील काम सोडून भलत्याच्या मागे धावू नका. न पटणार्‍या गोष्टी करू नका. उगाचच चिडचिड करू नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. गुरुप्रती निष्ठा कायम ठेवावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashi bhavishya panchang on 9th october navratri seven day kalratri devi bring mesh to meen love life strong read horoscope in marathi asp
Show comments