Rashi Parivartan 2022: बुद्धिदाता बुध देव पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये धनु व मकर राशीत गोचर करणार आहे. या दोन राशींच्या व्यतिरिक्त अन्यही राशींना बुध गोचराचे परिणाम दिसून येणार आहेत. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात ३ व २८ डिसेंबर अशा दोन दिवशी बुध ग्रहाचे गोचर होणार आहे. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर बुध एकाच महिन्यात दोनवेळेस राशी परिवर्तन करणार आहे. अर्थात यामुळे १२ राशींच्या कुंडलीत काही हालचाली होण्याचे संकेत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे बुध ग्रहाचे गोचर हे काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे तर काही राशींसाठी हे गोचर चिंताजनक ठरू शकते. बुद्धिदाता बुध ग्रहाच्या गोचराने कोणत्या राशीवर नेमका काय परिणाम होणार हे आपण जाणून घेऊयात..
डिसेंबर महिन्यात या राशींना बुध ग्रह गोचराचा लाभ
मीन
मीन राशीच्या मंडळींसाठी बुध देव हे चौथ्या व सातव्या स्थानी विराजमान होणार आहेत, हे लाभदायी स्थान मानले जाते. या काळात आपल्या मिळकतीत वाढ होण्याची मोठी संधी आहे. कुटुंबाची साथ लाभल्याने तुम्ही एकत्रित गुंतवणूक करण्याचा योग आहे. समाजात आपले स्थान उच्च पदावर नेण्याची ही सुवर्णसंधी ठरू शकते.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी बुध ग्रह आठव्या व अकराव्या स्थानाचे स्वामी आहे. हे स्थान व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर मानले जाते. या मंडळींना बुध ग्रह गोचरने व्यापार वृद्धीचे संकेत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांना महत्त्व दिले जाईल मात्र त्यासाठी तुम्ही संभाषणावर थोडे काम करण्याची आवश्यकता आहे. धार्मिक कारणाने प्रवासाचे योग आहेत.
बुध ग्रह गोचरामुळे ‘या’ राशींना सहन करावा लागू शकतो त्रास
कर्क
कर्क राशीच्या मंडळींसाठी बुध ग्रह हा प्रभाव कक्षेत तिसऱ्या व बाराव्या स्थानी स्थिर असतो. हे स्थान आपल्या आरोग्याशी संबंधित असते. कर्क राशीच्या मंडळींना बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. ग्रह बदलांसह ऋतू बदल होत असल्याने आपण नियमित व्यायाम व सुधारित जीवनशैलीचे पालन करायला हवे.
मकर
मकर राशीसाठी बुध ग्रहाचा प्रभाव हा सहाव्या व नवव्या स्थानावर जाणवणार आहे. या राशीच्या लोकांना या काळात एखाद्याच्या आजारपणामुळे आर्थिक खर्च सहन करावा लागू शकतो. पैशांची बचत करण्यात यश मिळणार नाही. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. यादरम्यान गुंतवणूक वगैरे काळजीपूर्वक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
२०२३ पासून शनिचा कुंभ राशीत प्रवेश; नववर्षात ‘या’ राशींमध्ये सुरु होणार साडेसाती व ढैय्याचा प्रभाव
कुंभ
कुंभ राशीच्या प्रभाव कक्षेत बुध ग्रह हा पाचव्या व आठव्या स्थानी असतो. या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. योजनेनुसार खर्च न केल्यास पैशाची कमतरता भासू शकते. असं असूनही तुम्हाला महिनाअखेरीस म्हणजे बुध गोचराच्या दुसऱ्या खेपेस काहीसा आराम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येतील मात्र तुम्ही संयम व अनुभवाने त्यावर उत्तर शोधू शकाल.
(टीप : वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित यास अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू समजू नये)