Rashi Parivartan 2022 November: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान बदलण्यासाठी परिक्रमण सुरु करतो तेव्हा सर्वांवरच त्याचा प्रभाव पडू शकतो. ठरविक काही दिवसांच्या कालावधीने ग्रहांची दिशा बदलून ते वेगवेगळ्या राशीत विजराजमान होत असतात. ग्रहांचे मार्गीकरण तसेच वक्री होणे हे मानवी जीवनात चांगले वाईट बदल घडवून आणते. काहींच्या बाबत याचा थेट तर काहींना अप्रत्यक्ष बदल दिसून येतो. यंदा दिवाळीनंतर काही दिवस म्हणजेच १३ नोव्हेंबरपर्यंत काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. या काळात बुध ग्रह तूळ राशीत आणि मंगळ मिथुन राशीत वक्री होणार आहे. यामुळे कोणत्या राशीवर कसा प्रभाव दिसून येणार हे जाणून घेऊयात..
मेष
बुध व मंगळाच्या वक्री होण्याने मेष राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढू शकतो, मात्र नशिबात यात्रेचे योग असल्याने तुम्हाला विनाकारण खर्च केला असे वाटणार नाही. प्रवासामुळे तुमच्या आरोग्यासंबंधित काही त्रास जाणवण्याची काही चिन्हे आहेत. व्यवसायात नवीन ग्राहकांशी जोडले जाण्यात समस्या येऊ शकतात त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो मात्र तुम्ही जितके स्थिर राहण्याचा प्रयत्न कराल तितके तुमच्या हिताचे ठरेल.
वृषभ
वृषभ राशिच्या व्यक्तींना पवैवाहिक जीवनांत अडचणी जाणवू शकतात आणि त्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. पती- पत्नीच्या नात्यात जर गैरसमजूतीने भांडण वाढत असेल तर संवाद साधणे अजिबात टाळू नका.
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींवर या राशी परिवर्तनाचा प्रभाव उन- सावलीसारखा असेल. एकीकडे दुःखी बातमी मिळाली तरी अनेक छोटे छोटे क्षण तुम्हाला सुखावून जातील. कामाच्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका विशेषतः कोणत्याही कागपत्रांवर सह्या करताना दोन वेळा तपासून पाहा.
वृश्चिक
आरोग्याच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अनावधानानेच पण चुका होण्याचे संकेत आहेत. थोडा निष्काळजीपणाही तुम्हाला मोठ्या काळासाठी तरा देणारा ठरू शकतो. उधार देणे टाळा व बजेट बनवून त्याचे पालन करा. तुमचे मित्र व शत्रू वेळीच ओळखा.
मीन
आईसह भांडण होण्याचे दाट संकेत आहेत. घरगुती कलह मिटवण्यासाठी मौन राहण्यास प्राधान्य द्या. तुमचा हळवा स्वभाव तुमच्या मित्रांपासूनही लपवून ठेवा अन्यथा तुम्हाला मनाविरुद्ध वागायला लावण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो.
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहेमी यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)