Rashifal 2024 Lucky Zodiac Signs : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. येणारे नवीन वर्ष हे मागील वर्षापेक्षा चांगले असावे असे प्रत्येकाला वाटते. तर येणाऱ्या नवीन वर्षात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. २०२४ हे वर्ष काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. तर काही राशींना या वर्षात खूप काळजी घ्यावी लागणार आहे. नवीन वर्षात शनी, राहू आणि केतू वगळता इतर सर्व ग्रह आपली चाल बदलणार आहेत. त्यामुळे २०२४ हे वर्ष कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरु शकतं ते जाणून घेऊया.

मेष रास

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

मेष राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष शुभ ठरणार आहे. तुम्हाला या वर्षात भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या आत्मविश्वास देखील वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. तसेच तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल, तर वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते.

मिथुन रास

२०२४ वर्षाची सुरुवात मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम देणारे ठरु शकते. तुम्हाला नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम ठरु शकतो. आर्थिक बाजू मजबूत राहू शकते. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. व्यवहारासाठी हा काळ शुभ आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना २०२४ मध्ये शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. नोकरी-व्यवसायासाठी हा काळ शुभ ठरु शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो.

हेही वाचा- वर्षाच्या अखेरीस ‘गजकेसरी योग’ आणि ‘गुरु पुष्य योग’ बनल्याने ‘या’ राशी २०२४ मध्ये होतील श्रीमंत? देवगुरु देऊ शकतात प्रचंड धन

धनु रास

२०२४ हे वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी वरदान ठरु शकते. या काळात तुमचे भाग्य उजळू शकते. तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील, तसेच खूप सन्मान मिळेल.पद आणि प्रतिष्ठा देखील वाढू शकते. गुंतवणुकीतून फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader