Shani Gochar and Surya Grahan 2025 : हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढील वर्षी २०२५ मध्ये सूर्यग्रहण आणि शनीचे राशी परिवर्तन एकाच दिवशी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. सध्या शनी कुंभ राशीत गोचर करीत आहे. २०२४ मध्ये शनी कोणत्याच राशीत संक्रमण करणार नाही. पण, पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करील. त्याच दिवशी सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे शनी गोचर आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी होणार असल्याने त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येईल; पण हा योग काही मोजक्या राशींसाठी फलदायी ठरणारा असू शकतो. त्यामुळे या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ते जाणून घेऊ.

२०२५ मधील सूर्यग्रहण आणि शनी गोचर तारीख

२९ मार्च २०२५ रोजी रात्री ११.०१ वाजता शनी आपला रासिबदल करील. शनी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करील. त्यानंतर पुढील अडीच वर्षे शनीदेव मीन राशीत राहील. याच दिवशी सूर्यग्रहण होणार आहे; जे ग्रहण भारतात दिसणार नाही.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा

२०२७ मध्ये शनिदेवाचे राशी संक्रमण

२०२५ मध्ये मीन राशीत प्रवेश केल्यानंतर शनी गुरुवार, ३ जून २०२७ मध्ये रोजी सकाळी मेष राशीत प्रवेश करील म्हणजे अडीच वर्षांनंतर शनीचा राशिबदल होईल.

शनी गोचर अन् सूर्यग्रहण एकाच दिवशी असल्याने ‘या’ तीन राशीधारकांना येतील सुखाचे दिवस?

सिंह

सूर्यग्रहणाच्या दिवशी शनीचे होणारे राशी संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. सिंह राशीच्या लोकांना अनेक त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. त्यांचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. शनीच्या प्रभावामुळे त्यांना जीवनात प्रत्येक टप्प्यात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्यामुळे व्यवसायात लाभ होईल आणि तुमचे उत्पन्न वाढू शकेल.

तूळ

शनीचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरू शकते. शनिदेवाच्या कृपेने त्यांना जीवनात सुखाची प्राप्ती होईल. त्यांची आर्थिक अडचणीतून सुटका होऊ शकते. मार्च २०२५ नंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. हा काळ व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरू शकतो.

मीन

शनीच्या राशिबदलामुळे मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यातही सुख-समृद्धीचे दिवस येऊ शकतात. या काळात तुम्हाला भौतिक सुख आणि संपत्ती प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. हा काळ कष्टकरी लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील, धनसंचय करण्यात यश मिळू शकेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader