वैदिक ज्योतिष्यशास्त्रामध्ये, शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. सर्व ग्रहांमध्ये शनिदेवाची चाल फार हळू मानली जाते. शनि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. प्रत्येक राशीसाठी शनिची स्थिती खूप महत्त्वाची असते. सर्व ग्रहामध्ये राशी बदलावेळी शनिदेवांना अधिक वेळ लागतो. म्हणूनच शनिदेवाच्या चालीतील बदलाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. शनिच्या हालचालीचा प्रत्येक राशीच्या लोकांवर खोल प्रभाव पडतो. आता शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून नव्या वर्षात मार्च २०२४ मध्ये शनिचा उदय होईल. तर जून २०२४ मध्ये शनि वक्री असणार आहेत. ते १५ नोव्हेंबरपर्यंत वक्री अवस्थेतच असणार आहेत. यामुळे नवीन वर्षात शनिदेवाच्या कृपेने काही राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे, पाहा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
नवीन वर्षात ‘या’ राशींना होणार धनलाभ?
मिथुन राशी
नवीन वर्षात मिथुन राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असू शकते. या राशीतील लोकांना अनेक क्षेत्रांतून, विशेषत: नोकरी आणि नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. या काळात प्रलंबित योजना पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. छोट्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो आणि नवीन व्यवसायही सुरू करु शकता.
(हे ही वाचा : १० वर्षांनी कन्या राशीत जुळून आलाय शुभ योग; ‘या’ राशींच्या लोकांना व्यवयायात मिळणार लाभ? मिळू शकतो अपार पैसा)
सिंह राशी
सिंह राशीच्या मंडळींना भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळू शकते. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार होऊ शकतो. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळू शकतो. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. कौटुंबिक सुख-शांती राहण्याची शक्यता आहे.
तूळ राशी
शनिदेव वक्री झाल्याने तूळ राशीच्या लोकांना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी प्रगतीची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांची चिंता मिटू शकते. आर्थिक आवक वाढू शकते. मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो. करिअरसोबतच आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. कार्य क्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुख मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)