Lucky Zodiac Signs 2024 : नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येकाची इच्छा असते की, नवीन वर्षात नवीन ध्येय, नव्या आशा आणि आनंदाने सुरू व्हावे. जोतिषशास्त्रानुसार वर्ष २०२४ मध्ये कित्येक ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे; ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. शनी आपल्या कुंभ राशीत विराजमान होणार आहे. त्याचबरोबर मे महिन्यात गुरू आपल्या मेष राशीतून बाहेर पडणार आहे. त्याचबरोबर राहू मीन; तर केतू कन्या राशीमध्ये विराजमान होणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार नवीन वर्षात काही राशींचे नशीब चमकू शकते. अपार यशासह धनप्राप्तीदेखील शक्यता आहे. चला जाणून घेऊ नवे वर्ष २०२४ हे कोणत्या राशींसाठी भाग्यवान आहे.
मेष
नवीन वर्षात या राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून एप्रिल महिन्यापर्यंत गुरू, बुध पहिल्या घरात विराजमान असतील. अशा स्थितीमध्ये मेष राशीच्या लोकांना पद-प्रतिष्ठेसह मान-सन्मानही मिळू शकतो. दीर्घकाळ अडकून राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात; जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. व्यवसायाबाबत सांगायचे झाल्यास, अपार यशासह भरपूर धनलाभ होईल. व्यवसायाची वेगाने प्रगती होईल. त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्येही भरपूर प्रगती होईल. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील; ज्यामुळे बचत करण्यात यश मिळेल, तसेच कुटुंबासह चांगला वेळ जाईल. त्याचबरोबर या राशीमध्ये राहू दुसऱ्या घरात असल्यामुळे परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
हेही वाचा – ३० नोव्हेंबरला ‘या’ राशीची होणार चांदी? शुक्रदेवाच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठीही वर्ष २०२४ चांगले ठरणार आहे. देवतांचे गुरू नवव्या घरातून मार्गक्रमण करणार आहे. अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. शेअर बाजारामध्ये लॉटरीमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शनी या राशीच्या सहाव्या घरात स्थित असल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. व्यवसायामध्येही चांगली प्रगती होईल. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. दरम्यान, वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होऊ शकतो; पण तुम्हाला यश मिळू शकते. त्याचबरोबर अध्यात्माबाबत तुमची रुची वाढेल.
हेही वाचा – Tulsi Vivah 2023: केव्हा आहे तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
धनू
धनू राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष २०२४ चांगले ठरणार आहे. एप्रिल २०२३ पर्यंत या राशीमध्ये गुरू पाचव्या घरात असणार आहे. त्यानंतर मे महिन्यापासून तो सहाव्या घरात विराजमान होणार आहे. अशा स्थितीमध्ये अविवाहित लोकांना लग्नासाठी स्थळे येऊ शकता. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना लाभ मिळण्याची पूर्ण संधी आहे. नोकरदारांना पदोन्नतीसह कोणतीही मोठी जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासामध्येही वाढ होऊन, व्यापारामध्ये खूप फायदा होईल. वैवाहिक आयुष्यात आनंद मिळेल. राहू या राशीच्या चौथ्या घरामध्ये विराजमान असल्यामुळे बदल घडू शकतो. त्याचशिवाय केतू या राशीच्या चौथ्या घरात असल्यामुळे कार्यक्षेत्रात अपार यश मिळण्यासह पद-प्रतिष्ठा व सन्मान मिळेल. तसेच या वर्षात आरोग्य चांगले राहील.
टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.