Grah Gochar July 2024: ज्योतिष शास्त्रानुसार जुलै महिना खूप खास आहे, या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जुलैमध्ये चार महत्त्वाचे ग्रह राशी बदल करणार आहेत. शनिदेव नुकतेच वक्री झाले असून १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ते याच स्थितीत असतील. या महिन्यात शुक्र, मंगळ, सूर्य आणि बुध या ग्रहांचे गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. चला जाणून घेऊया जुलै महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो.
जुलैपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकेल?
वृषभ राशी
जुलै महिन्यातील ग्रहांचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.
कन्या राशी
जुलै महिन्यातील ग्रहांचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. जे लोक रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगली डील मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढू शकते.
(हे ही वाचा : १०० वर्षांनी ३ ग्रहांची महायुती ‘या’ राशींना करणार लखपती? सुख, समृद्धी व शांती घेऊन माता लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी )
वृश्चिक राशी
जुलै महिन्यातील ग्रहांचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारे ठरु शकते. जे बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळणे शक्य आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते. जे लोक सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहेत त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यातील ग्रहांचे गोचर वरदानच ठरु शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे गोचर अनुकूल ठरु शकते. अचानक जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला या काळात एखादी चांगली बातमी मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)