Grah Gochar September 2024: ज्योतिष शास्त्रानुसार सप्टेंबर महिना खूप खास आहे, या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात तीन मोठे ग्रहांचे गोचर होणार आहे. बुध, सूर्य आणि शुक्र आपल्या राशी बदलतील. ४ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल. त्याचवेळी, १६ सप्टेंबर रोजी, सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. धनाचा दाता शुक्र १८ सप्टेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल आणि शेवटी २३ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे. अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये, सप्टेंबर महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो. चला जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा