makar sankranti 2023 : सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, यालाचा मकर संक्रांती म्हटलं जातं. या वर्षी मकर संक्रांतीचा उत्सव १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. ७ जानेवारीपासून माघ महिना सुरु होणार आहे. हिंदू धर्मात माघ महिन्याचं विशेष महत्व असतं. माघ महिन्यात अनेक उपवास आणि उत्सव साजरे केले जातात. यामध्ये मकर संक्रांतीचा प्रमुख उत्सव असतो. प्रत्येक वर्षी मकर संक्रांती १४ जानेवारीला साजरी केली जाते. ज्योतीष शास्त्रानुसार मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या तारखेपासून सूर्य देव उत्तरायण होत जातो. हिंदू शास्त्रात सूर्यदेवाच्या उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे. पूर्ण वर्षात एकूण १२ संक्रांती असतात.
मकर संक्रांतीच्या प्रमुख मान्यता
१) मकर संक्रांतीला सूर्य दक्षिणायनपासून उत्तरायणच्या प्रवासाला सुरुवात करतो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचं मकर रेषेपासून उत्तरेच्या कर्क रेषेकडे जाणं म्हणजे उत्तरायण होय. तर कर्क रेषेवरून दक्षिणी मकर रेषेकडे जाण्याला दक्षिणायनचा प्रवास सुरु होतो. शास्त्रांमध्ये उत्तरायणला देवांचे दिवस आणि दक्षिणायनला देवांची रात्र म्हटलं जातं.
२) मकर संक्रांतीला सूर्यदेव त्यांचा मुलगा शनीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. ज्योतीषमध्ये मकर राशीचे स्वामी शनीदेव असतात. सूर्य आणि शनीदेव यांच्यात शत्रुत्व असतं. पण जेव्हा सूर्यदेव स्वयं शनीदेवला भेटायला जातात, तेव्हा त्यांच्या पिता-पुत्र अशाप्रकारचं नातेसंबंध असतो. अशाप्रकारे मकरसंक्रांतीला सूर्यदेवाची उपासना आणि शनी देवाशी संबंधीत गोष्टींचं दान केल्यावर कुंडलीत सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात.
३) ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हापासून वातावरणात बदल सुरु होतात. या दिवसापासून शरद ऋतुचा शेवट आणि वसंत ऋतुची सुरुवात होते. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी व्हायला लागते.
४) मकर संक्रांतीपासून देवांची रात्र समाप्त होते आणि दिवसाला प्रारंभ होतो. या तारखेपासून सूर्य दक्षिणायनपासून उत्तरायणला जातो. भीष्माने मकर संक्रांतीच्या दिवशीच त्यांच्या प्राणाचं त्यागं केलं होतं.
५) मकर संक्रांतीला गंगासागरमध्ये आंघोळ करण्याचं विशेष महत्व असतं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा माता भागीरथच्या प्रार्थनेनं प्रसन्न होते. त्यानंतर त्यांच्या मागे चालत कपिल मुनींच्या आश्रमात जाऊन सागराला मिळते. या कारणामुळेच मकर संक्रांतीला गंगासागरमध्ये आंघोळ करण्याचं महत्व आहे. या तारखेला भागीरथांनी त्यांच्या पूर्वजांचा तप केला होता.
६) मकर संक्रांती देशाच्या विविध भागात अनेक प्रकारे साजरी केली जाते. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये मकर संक्रांती लोहडीच्या नावाने साजरी केली जाते. दक्षिण भारतात याला पोंगलच्या रुपात तर आसाममध्ये भोगली बिहूच्या नावानं ओळखलं जातं. बंगालमध्ये मकर संक्रांती उत्तरायणच्या रुपात साजरी केली जाते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मकर संक्रांतीला खिचडीच्या नावाने ओळखलं जातं. गुजरात आणि राजस्थानमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवलं जातं.
नक्की वाचा – मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर चमकू शकते ‘या’ तीन राशींचे नशीब; ‘त्रिग्रही’ योगामुळे मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
७) माघ महिन्यात मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत येतो. तेव्हा प्रयागच्या पावन संगम तटावर सर्व देव, दैत्य, किन्रर आणि माणसांच्या समुहात आंघोळ करतात.
८) मकर संक्रांतीला विशेषत: खिचडीचा पर्व मानलं जातं आणि यादिवशी खिचडी दान करण्याला विशेष महत्व दिलं जातं.
९) मकर संक्रांतीला तीळ संक्रांतीही बोललं जातं. तसंच या दिवशी तीळाचं दान करण्याला विशेष महत्व असल्याचं मानलं जातं. यादिवशी तीळाचं दान केल्यावर शनीदोष दूर होतं.
नक्की वाचा – मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन का करतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण
१०) मकर संक्रांतीला गुळाचं दान केल्यावर गुरु ग्रहाचा आशिर्वाद प्राप्त होतो. मकर संक्रांतीला तूप आणि मीठाचं दान करण्याला विशेष महत्व दिलं जातं. यामुळे जीवनात भौतिक सुखाची प्राप्ती होते आणि वाईट काळ दूर होतो.