ज्योतिष शास्त्रामध्ये राशीच्या आधारावरही व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील लपलेले पैलू कळू शकतात. प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता स्वामी ग्रह असतो आणि त्याचा प्रभाव त्या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वावर स्पष्टपणे दिसून येतो. ग्रहांमध्ये शत्रुत्व आणि मैत्रीची भावना देखील आहे, त्यामुळे विशिष्ट राशीच्या लोकांमध्ये आपापसात पटण्याची किंवा न पटण्याची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत, लग्नासाठी राशीनुसार अनुकूलता चाचणी घेणे चांगले ठरते. जर जीवन साथीदारांच्या राशीच्या ग्रहांमध्ये शत्रुत्वाची भावना असेल तर त्या राशीच्या लोकांचेही एकमेकांशी पटणार नाही.
कुंडली जुळण्यासोबतच लग्न किंवा प्रेमाच्या नात्याने बांधलेले लोक आपापसात कसे राहतील हे राशींच्या मदतीने देखील कळू शकते. किंवा एखाद्या राशीसाठी कोणत्या राशीची व्यक्ती चांगली जीवनसाथी सिद्ध होऊ शकते, हेही आपण जाणून घेऊ शकतो. आज आपण विशिष्ट राशींच्या लोकांसाठी कोणत्या राशींचे लोक योग्य जोडीदार सिद्ध होऊ शकतात हे जाणून घेऊया.
Astrology : नकळतही करू नयेत ‘या’ चुका; अन्यथा शुक्र, शनि, गुरू देतील अशुभ परिणाम
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी मिथुन आणि तूळ राशीचे लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात.
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी मकर आणि वृश्चिक राशीचे लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी वृषभ, तूळ आणि सिंह राशीचे लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात.
कर्क: कर्क राशीच्या लोकांनी सिंह, मेष किंवा धनु राशीला जीवनसाथी म्हणून निवडावे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी धनु राशीचे लोक उत्तम जोडीदार असतील. याशिवाय कर्क, मेष, वृश्चिक आणि मीन राशीतूनही जोडीदार निवडता येईल.
येणारे १४१ दिवस शनिदेव राहणार प्रतिगामी अवस्थेत; ‘या’ तीन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी मकर किंवा वृषभ राशीची व्यक्ती चांगली जोडीदार ठरू शकते.
तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीचे लोक उत्तम जोडीदार असतील, परंतु मेष, मिथुन, कन्या आणि मकर राशीच्या लोकांशीही त्यांचे चांगले संबंध निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वृषभ, धनु, कर्क आणि मीन राशीचे लोक उत्तम जोडीदार असू शकतात.
धनु : धनु राशीच्या लोकांनी जीवनसाथी निवडताना सिंह आणि मेष राशीच्या लोकांना प्राधान्य द्यावे.
मकर: वृश्चिक राशीचे लोक मकर राशीचे चांगले जोडीदार असतील. याशिवाय त्यांचे वृषभ, मिथुन, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांशीही चांगले संबंध असतील.
कुंभ: या राशीच्या लोकांनी सिंह आणि वृषभ राशीच्या लोकांमध्ये आपला जीवनसाथी निवडावा.
मीन: कर्क, मेष आणि वृश्चिक हे मीन राशीच्या लोकांसाठी चांगले भागीदार असतील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)