प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे पैशांचा व्यवहार करताना काळजीपूर्वक केला जातो. कधी कधी अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. मात्र कर्जाचे हप्ते फेडताना नाकी नऊ येतात. ज्योतिषशास्त्रात कर्ज आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार मंगळवार हा पवनपुत्र मारूतीचा दिवस आहे. या दिवशी मारुतीची मनोभावे पूजा केली जाते. पवत्रपुत्र हनुमंतांना संकटमोचक संबोधलं जातं. त्यांना शरण गेल्यास दु:खातून सुटका होते अशी मान्यता आहे.वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी काही विशेष उपाय केल्यास मारुतीची कृपा प्राप्त होऊ शकते. जाणून घेऊयात.
कर्ज फेडण्यासाठी मंगळवार हा दिवस चांगला मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी कर्जाची परतफेड केल्यास पुन्हा कर्ज घेण्याची गरज नाही. मात्र या दिवशी चुकूनही कर्ज घेऊ नये. तर जीवनात कधीही कर्ज घ्यावयाची वेळ आली, तर कर्ज प्रक्रिया बुधवारी करू नये, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी कोणाकडून कर्ज घेतल्यास ते चुकते करताना नाना प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता असते. कर्ज घेण्यासाठी आणि काही रक्कम कर्ज म्हणून देण्यासाठी शुक्रवार हा शुभ दिवस मानण्यात आला आहे. शुक्रवार हा दिवस आर्थिक व्यवहारासाठी उत्तम मानला गेला आहे. यामुळे नुकसान होत नाही, असे सांगितले जाते.
लवकरच सुरु होणार शनि साडेसातीचा कठीण काळ!; या राशीच्या लोकांसाठी खडतर काळ
कर्जातून मुक्ती मिळावी यासाठी मंगळवारी मावशी किंवा बहिणीला लाल कपडे भेट द्या. मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ, सिंदूर, चमेलीचे तेल, केवड्याचे अत्तर, गुलाबाची माळ आणि गूळ अर्पण करा. या दिवशी हनुमान चालीसा आणि श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी आत्या किंवा बहिणीला लाल कपडे भेट द्या. मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीला केवडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात बसून रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. बजरंग बाणचा पाठ केल्यास सर्व संकटे दूर होतात. मंगळवारी मीठ आणि तुपाचे सेवन करू नये. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. मंगळवारी काचेची भांडी खरेदी करणे टाळा. मंगळवारी जमीन खरेदी करू नये किंवा भूमीपूजन करू नये. मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे विकत घेऊ नयेत किंवा घालू नयेत. मंगळवारी लाल किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.