Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा ग्रह संपत्ती, बुद्धिमत्ता, व्यावसायिक कौशल्य, तर्कशास्त्र, संवाद आणि भाषण यांचे प्रतिनिधित्व करतो. कुंडलीत बुधाची अनुकूल स्थिती अफाट बुद्धिमत्ता, व्यवसायात यश आणि वाणीत वक्तृत्व गुण देते. म्हणूनच बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये कोणताही बदल एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करू शकतो. हा बदल ११ जुलै २०२३ रोजी झाला आहे. या तिन्ही राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या उदयामुळे मोठे यश आणि संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आजपासून ‘या’ तिन्ही राशींवर बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव दिसेल आणि गणपती बाप्पाच्या कृपेने या राशींची प्रगती होईल असे मानले जात आहे.
मिथुन
बुधाच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना जबरदस्त लाभ मिळू शकतो. आर्थिक समस्यांमधून सुटका होऊन लाभ होऊ शकतो. रखडलेले पैसे परत मिळू शकतात आणि उत्पन्न वाढू शकते. त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळेल, ज्यामुळे त्यांना मालमत्ता किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या संधी, पदोन्नती किंवा बदली यासंबंधी चांगली बातमी येऊ शकते.
हेही वाचा – Chanakya Niti : तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे घरात टिकत नाही लक्ष्मी; जाणून घ्या काय सांगतात आचार्य चाणक्य
कन्या
कन्या राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या उदयामुळे लाभ होऊ शकतो आणि ते अनुकूल परिणाम आणि यश अनुभवू शकतात. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल, त्यामुळे नफा वाढण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांचे उत्पन्नही वाढू शकते. परिणामी, आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. त्यांना आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. कामाच्या ठिकाणी त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात एकंदरीत सुधारणा दिसून येऊ शकते.
हेही वाचा – जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांचा कसा असतो स्वभाव? होऊ शकतात ते श्रीमंत, आकर्षक व लोकप्रिय!
मकर
बुध ग्रहाच्या उदयाचा मकर राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि जीवनाच्या विविध पैलूंमध्ये ते अनुकूल परिणाम अनुभवू शकता. पदोन्नती, वेतनवाढ आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांचे बराच काळ रखडलेले पैसे मिळू शकतात किंवा कायदेशीर बाबी यशस्वीरित्या सोडवल्या जाऊ शकतात. त्यांच्या वैवाहिक संबंधांमध्ये प्रगती आणि वाढीची अपेक्षा केली जाऊ शकते, जुन्या समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)