8th September Rashi Bhavishya & Panchang : आज ८ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी रविवारी संध्याकाळी ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत राहील. तसेच १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत इंद्र योग कायम राहील. तर स्वाती नक्षत्र दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज राहुकाळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच आज ऋषीपंचमी व्रत सुद्धा आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जातात. ऋषीपंचमीचे हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करतात. या दिवशी सात ऋषींची पूजादेखील केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. ऋषीपंचमी पूजा मुहूर्त सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल. तर १२ पैकी कोणत्या राशीचा दिवस सुख-समाधानात जाईल व कोणाचा धावपळीचा आपण जाणून घेऊ या…

८ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य

मेष:- काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल.

वृषभ:- गुंतवणुकीसाठी सल्ला महत्त्वाचा. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता लाभेल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.

मिथुन:- कामातील बदल लक्षात घ्या. काही नवीन तांत्रिक बाबी शिकून घ्या. कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल. विनाकारण बढाया मारू नका. मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल.

कर्क:- नवीन व्यवहार करताना विचार करावा. घरासाठी काही खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्‍या प्राधान्याने पार पाडाल. थोडी काटकसर करावी लागेल. दिवस मध्यम फलदायी.

सिंह:- जुने आजार अंगावर काढू नका. व्यापार्‍यांना हा‍तमिळवणी करावी लागेल. नोकरदारांनी आळस करू नये. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. वडीलांचे मोलाचे सहकार्य लाभेल.

कन्या:- घरात धार्मिक कार्य घडेल. मन उत्साही राहील. मित्रांच्या सहवासात रमाल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल.

तूळ:- कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. दिवस मनासारखा घालवाल. कामाचा ताण जाणवेल. योग्य ताळमेळ साधता येईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

वृश्चिक:- कौटुंबिक समतोल राखावा. प्रेम व्यक्त करा. मनाची चंचलता सांभाळावी. कामाच्या बाबतीत हयगय करू नका. समस्यांचे निराकरण शक्य.

धनू:- घरातील वातावरण शांत ठेवा. नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. तज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग. प्रलंबित कामे मार्गी लावा. दैनंदिन कामात टाळाटाळ करू नका.

मकर:- घरातील गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भावंडांची काळजी लागून राहील. प्रवास जपून करावा.

कुंभ:- गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. मन:शांति लाभेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल.

मीन:- व्यवसायिकांना उत्तम काळ. नवीन घडामोडी घडतील. क्षुल्लक गोष्टींचा त्रास जाणवेल. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. मानसिक स्वास्थ्य जपावे

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi panchami vishesh rashi bhavishya on 8th september indra yog will be blessed zodic signs with money and love read marathi daily horoscope asp
Show comments