भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जाते. हे व्रत सप्तऋषींना समर्पित आहे. महिला हे व्रत करतात आणि सप्तर्षींची पूजा करून कथा वाचतात. यावर्षी हे व्रत आज, म्हणजेच १ सप्टेंबर २०२२ रोजी ठेवण्यात येणार आहे. या व्रतामध्ये ब्राह्मणांना दान व दक्षिणा देण्याचे मोठे महत्त्व आहे. आज आपण ऋषीपंचमीचे व्रत आणि पूजा करण्याची पद्धत, शुभ मुहूर्ताचे महत्त्व, कथा आणि या दिवशी जप करायचे मंत्र याबद्दल जाणून घेऊया.

पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी ३१ ऑगस्ट दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरु झाली असून आज दुपारी २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. यंदा ऋषी पंचमी व्रताची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त १ सप्टेंबर २०२२, गुरुवार रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असेल.

La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
karan arjun salman and shah rukh khan blockbuster movie re releases
‘मेरे करन अर्जुन आएंगे…’, ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ब्लॉकबस्टर चित्रपट! सलमान खानने जाहीर केली तारीख…
Vasu Baras 2024 Date Shubha Muhurat! What is meaning of Vasu Baras
Vasu Baras 2024 Date: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त
Narak Chaturdashi 2024 Date Confusion| Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : आज साजरी केली जाईल नरक चतुर्दशी; अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?
Grah Gochar 2024 : maa Lakshmi will give immense money
लक्ष्मीपूजनापूर्वी ५ मोठे ग्रह करणार गोचर, लक्ष्मी देणार ‘या’ पाच राशींना दिवाळी गिफ्ट, मिळणार अपार पैसा
allu arjun rashmika mandanna starr Pushpa 2 The Rule new release date annouced
बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, ६ डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला पुष्पाराज येणार भेटीस
Diwali is in next week There will be various events in sky as well
दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…

Monthly Horoscope September 2022 : सप्टेंबर महिन्यात ‘या’ राशींना मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या मासिक राशीभविष्य

ऋषी पंचमी व्रत आणि पूजा विधी

  • ऋषीपंचमीचे व्रत एकच वेळ जेवण करून ठेवले जाते. पूजेनंतर फळे व सुका मेवा खाऊन व्रत सोडावे.
  • घरातील पूजाघर स्वच्छ करून कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या ऋषींची पूजा करा.
  • हळद-कुंकूच्या मदतीने एक चौकोनी मंडल तयार करा. या मंडलावर सप्तऋषींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर नियमानुसार पूजा करावी.
  • सप्तऋषींना वस्त्र, चंदन, धागा, फुले आणि फळे अर्पण करा. मिठाईचा नैवेद्य दाखवा. शेवटी ऋषीपंचमी व्रताची कथा अवश्य वाचा. कथा वाचल्याशिवाय या व्रताला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही, असे म्हणतात.

ऋषी पंचमीला या मंत्राचा जप करा

  • कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।
  • जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।
  • गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)